Love stories, YouTube videos, Smiles, Aamir/ एक 20 वर्षांची मुलगी आपल्या नोकराच्या प्रेमात पडली. घरातील जनावरे सांभाळण्यासाठी त्यांनी एक नोकर ठेवला होता. मात्र त्याच्या प्रामाणिकपणाने तरुणीला आपलसं केल आहे. त्याचा मनमोकळेपणा आणि प्रामाणीकपणा पाहून मुलीने त्याला लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. मुलगी म्हणते लहान असो वा मोठा, श्रीमंत असो वा गरीब प्रेमात हे पाहिले जात नाही.
मुस्कान असे या मुलीचे नाव असून ती मूळची पाकिस्तानातील पंजाबची आहे. मुस्कानने एका यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितले की ती 25 वर्षीय आमिरच्या प्रेमात कशी पडली. घरातील म्हशी सांभाळण्यासाठी त्यांनी त्याला अमीरला ठेवले होते. मुस्कान म्हणते की, तिच्याकडे चार म्हशी होत्या, ज्यांची काळजी घेण्यासाठी आमिरला कामावर ठेवले होते.
आमिर खूप प्रामाणिक होता आणि आपले काम मनापासून करत असे. तो आल्यानंतर म्हशीने अधिक दूध देण्यास सुरुवात केली. मुस्कान आमिरच्या कामाने खूप प्रभावित झाली आणि हळूहळू तिला आमिर आवडू लागला. एके दिवशी तिने आमिरशी तिच्या मनातील गोष्ट बोलण्याचे ठरवले.
https://youtu.be/9XFzRY82nbo
आमिर म्हशीला तबल्यात आंघोळ घालत असताना मुस्कानने आमिरला प्रपोज केले. मुस्कान म्हणाली की, मला तू आवडायला लागला आहे आणि तुझ्याशी लग्न करायचे आहे. हे ऐकून आमिरला क्षणभर धक्काच बसला. मुस्कानने आमिरला उत्तर देण्यासाठी संध्याकाळपर्यंतची मुदत दिली. संध्याकाळी घरच्यांना विचारून आमिरने मुस्कानचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला.
20 वर्षीय मुस्कान तिच्या आईसोबत घरात एकटीच राहते. तिच्या आईने तिला नोकराशी लग्न करण्यास मनाई केली नाही. आमिरसोबत लग्न केल्यानंतर मुस्कानने म्हशींची काळजी घेण्यासाठी आणखी तीन लोकांना कामावर ठेवले आहे. ती म्हणते की, लग्नानंतर मी आमिरवर आणखी प्रेम करायला लागले. त्याचवेळी आमिर म्हणतो की, मुस्कानसोबत लग्न करून त्याला सर्व काही मिळाले.
आमिरने त्याची पत्नी मुस्कानसाठी एक गाणे देखील गायले आहे, तेरे इश्क में पागल हो गया, दीवाना तेरे रे… त्याचवेळी, मुस्कानेही एका शायरीतून प्रेम व्यक्त केले, “चांदनी चांद से होती है, सितारों से नहीं. मोहब्बत एक से होती है हजारों से नहीं”.
महत्वाच्या बातम्या-
अजब प्रेमकहाणी! प्रेमात वेडा झालेला पुतण्या काकीसोबत पळाला, मग काकाने केली ‘अशी’ अवस्था
Elon musk: एका स्त्रीसाठी का भिडले जगातील सर्वात श्रीमंत दोन व्यक्ती? जगभरात चर्चेत आलीये ‘ही’ प्रेमकहाणी
Raju Srivastava: जिच्यासाठी १२ वर्ष थांबले तिला आता डॉक्टर जवळही येऊ देत नाही, वाचा राजू श्रीवास्तवची प्रेमकहाणी