Share

advertisement : मित्रांना गर्लफ्रेंड मिळेना म्हणून मैत्रिणीने शोधला भन्नाट उपाय; आता मुलींच्या लागल्या रांगा, नेमकं काय केलं?

गेल्या काही वर्षांमध्ये मार्केटिंग क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. आज प्रत्येक गोष्टींची मार्केटिंग केली जाते. सोशल मीडियावर, किंवा सार्वजनिक ठिकाणावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती दिसतात. तुम्ही आत्तापर्यंत अनेक हटक्या जाहिराती पाहिल्या असतील.

मात्र, सध्या सोशल मीडियावर अशी एक जाहिरात व्हायरल होत आहे, जी तुम्ही याआधी कधी वाचली नसेल. या अजब गजब जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्ही अशा प्रकारची जाहिरात याआधी कधीच पाहिली नसेल याची आम्हाला खात्री आहे.

ही जाहिरात एका मैत्रिणीने आपल्या मित्रांसाठी केली आहे. मित्रांना गर्लफ्रेंड मिळत नाही म्हणून तिने चक्क गर्लफ्रेंड हवी आहे, महिन्याला दोन लाख रुपये घ्या आणि गर्लफ्रेंड बना अशी जाहिरात केली आहे. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

ज्या तरुणांसाठी ही जाहिरात आहे ते चीनचे आहेत तर, त्यांना गर्लफ्रेंड मिळावी म्हणून मदत करणारी मैत्रीण थायलंडची आहे. तिने  Ok Mai Mai नावाच्या फेसबुक पेजद्वारे आपल्या मित्रांसाठी गर्लफ्रेंड शोधण्याचं मिशन सुरू केलं आहे.

तिने सोशल मीडियावर याबाबत जाहिरात टाकताना लिहिले की, ‘माझे दोन चिनी मित्र असून, त्यांना गर्लफ्रेंड हवी आहे. त्या दोघांचे वय १८ते२३ च्या दरम्यान आहे. जी कोणी गर्लफ्रेंड बनेल तिला महिन्याला २.१६ लाख रुपये देण्यात येतील. जर तुमचं काम आवडले तर आणखी पैसे मिळतील.’

याशिवाय तिने जाहिरातीत काही अटी देखील टाकल्या आहेत. जसे की, मुलीला चिनी भाषा अवगत असावी, ती तिच्या कामात चांगली असावी, ती ड्रग्ज सेवन करणारी नसावी. या जाहिरातीवर आता अनेक मुलींनी अर्ज केले आहेत. माहितीनुसार, त्या चिनी मित्रांना आता गर्लफ्रेंड देखील मिळाली आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now