महाराष्ट्रातील अनेक भागात गैरपध्दतीने गांजाची लागवड करण्यात येत आहे. राज्यात गांजाचे पिक शेतात लागवडीसाठी घेण्यास बंदी असताना देखील अनेकजण या नियमाचे उल्लंघन करताना दिसत आहेत. आता देखील अशीच एक घटना औसा तालुक्यातील खुंटेगावातुन उघडकीस आली आहे.
या गावातील 70 वर्षीय विठ्ठ्ल पांढरे आपल्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड करत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या शेतकऱ्यांला अटक केली आहे. या शेतकऱ्यांकडून पोलिसांनी 1 लाख 50 हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे. औसा तालुक्यात हा प्रकार उघडकीस आल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे.
गांजा लागवडी विरोधात राज्यात कठोर नियम असताना देखील या शेतकऱ्याने आपल्या शेतामधील गोठ्याला लागूनच तब्बल 30 गांजाच्या झाडांची लागवड केली होती. यामधून त्याने चांगलेच उत्पन्न देखील मिळविले होते. लावलेल्या झाडांमधून आणखीन उत्पन्न मिळेल असा आशावाद शेतकरी विठ्ठ्ल पांढरे यांनी बाळगला होता.
मात्र यापूर्वीच त्यांचे पितळ उघडे पडले. पोलिसांना गांजा लागवडीची माहिती मिळताच त्यांनी विठ्ठ्ल पांढरे यांच्या शेतात धाव घेतली. तसेच सर्व माल जप्त करत झाडांना जागीच जाळून टाकले. यानंतर पोलिसांनी विठ्ठ्ल पांढरे यांच्यावर टकेची कारवाई केली. हि कारवाई पोलीस निरिक्षक शंकर पटवारी, पोलीस अधिकारी मधुकर पवार यांनी पार पाडली.
मुख्य म्हणजे नगर भागात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई होती. यापुर्वीच एका शेतकऱ्यांला गांजा लागवडीच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. सध्या याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. गांजा झाडांच्या लागवडीमध्ये आणखीन काही जणांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजाची लागवड सहसा ऊसाच्या शेतात करण्यात येते. सध्या ऊस गाळप हंगाम सुरु झाला असल्यामुळे असे प्रकार समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या तपासात पोलिसांनी आरोपीवर गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ, अधिनियम सन १९८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
नवाब मलिक खरंच भंगारवाले होते का? भंगारवाले होते तर त्यांची राजकारणात एन्ट्री कशी झाली?
मोठी बातमी! आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून नवाब मलिक यांना अटक, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
चेन्नई सुपर किंग्सच्या धडाकेबाज खेळाडूला दिल्ली कॅपिटल्सने पळवले, धोनीला मोठा धक्का
लग्नाला एक वर्ष होऊनही पतीने शारिरीक संबंध ठेवण्यास दिला नकार, पत्नीने उचलले धक्कादायक पाऊल