याचबरोबर शेतीत नवनवीन प्रयोग करून समाजासोमोर एक आदर्श उभा करत आहेत. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.शेतकऱ्याला टोमॅटो शेतीने लखपती केलं आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दराने चक्क शंभरी पार केली आहे.
यामुळे टोमॅटोची लागवड केलेल्या शेतकऱ्याचे सोन्याचे दिवस आले आहेत. बारामती तालुक्यातील मौजे सस्तेवाडी येथील युवा शेतकरी गणेश कदम यांनी देखील यंदा टोमॅटोची लागवड केली होती. त्यांना चांगला भाव मिळाल्याने कदम यांना लाखोंना नफा मिळाला आहे.
वाचा यशस्वी यशोगाथा..! गणेश कदम यांनी यंदा आपल्या 12 एकर क्षेत्रापैकी दहा एकरात भाजीपाला लागवड केली. आणि उर्वरित दोन एकरात त्यांनी टोमॅटोची लागवड केली. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश यांना दोन एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड करण्यासाठी आतापर्यंत सुमारे चार लाख रुपये खर्च आला आहे.
विशेष बाब म्हणजे, गोव्याच्या बाजारपेठेत गणेश यांना पुणे-मुंबईच्या तुलनेत कॅरेटमागे 200 ते 250 रुपयांनी अधिक दर मिळाला आहे. त्यांना आतापर्यंत 18 लाखांचा नफा झाला आहे. पंचक्रोशीत गणेश यांची मोठी चर्चा रंगली आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.
अवघ्या 4 महिन्यांत टोमॅटोच्या उत्पादनातून गणेश यांना 18 लाखांचा नफा झाला आहे. तर आता शेतकरी बांधव टोमॅटोच्या शेतीतुन चांगली कमाई करत आहेत. टोमॅटोच्या भावात वाढ झाल्याने शेतकरी सध्या आनंदात आहेत. तर आता अवकाळी पावसाचे देखील बळीराजावर संकट आहे.