महिन्याभरापासून शिवसेना पक्षाची मोठी वाताहात झाली. त्यातून पक्षाला पुन्हा सावरण्याचा प्रयत्न शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे करत आहेत. ते शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करून त्यांना बळ देत आहे. (A direct question was asked by this rebel MLA to Aditya Thackeray)
आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आता मनमाडला येऊन पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे नांदगाव मधील आमदार सुहास कांदे काही प्रश्न विचारणार आहेत, अशी मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे.
सुहास कांदे आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत पाच हजारहून अधिक कार्यकर्ते असणार आहे. हिंदुत्वासाठी लढलो ही माझी चूक झाली काय? असा सवाल ते आदित्य ठाकरे यांना करणार असल्याचे बोलले जाते.
आजपर्यंत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे अथवा आदित्य ठाकरे यांनी केलेल्या विधानांवर शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून कोणताही उलट सवाल केला जात नव्हता. परंतु आता थेट ठाकरेंनाच सवाल करण्यासाठी सुहास कांदे मैदानात उतरले आहेत.
हिंदुत्वासाठी लढलो ही माझी चूक आहे काय? त्याच सोबत काँग्रेस राष्ट्रवादीविषयी सुद्धा कांदे आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारणार आहेत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. गटाला वेगळे नाव सुद्धा दिलेले नाही. बाळासाहेबांचे विचारच पुढे घेऊन जात आहोत. तरीसुद्धा तुम्ही आम्हाला गद्दार कसे म्हणता? असा रोकठोक सवाल ते विचारणार आहे.
अशाप्रकारे आदित्य ठाकरे यांना थेट सवाल करत सुहास कांदे आपल्या मनातील सगळी खदखद व्यक्त करणार असल्याचे दिसते. जर आदित्य ठाकरेंनी प्रश्नांची उत्तरे दिली. तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवू, असे सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डिएसकेंना जामीन मंजूर; ‘या’ कारणामुळे मिळाला जामीन
Lal Bahadur Shastri Death: लाल बहादुर शास्त्रींच्या मृत्युमागे होता CIA चा हात? अनेक वर्षांनंतर झाला मोठा खुलासा
President: राष्ट्पतींची ताकद किती असते? त्यांना शपथ कोण देतं? वाचा पगारापासून ते सर्व सुखसोयींबद्दल…