Share

ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून जेवण घेण्यास दिला स्पष्ट नकार; अन् केलं असं काही केली वाचून तुम्हाला येईल चीड

swiggy delivery boy
अलीकडे ऑनलाइन फूड मागविण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे डिलिव्हरी बॉयवर होणाऱ्या हल्ल्यांचे देखील प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे, अलीकडे डिलिव्हरी बॉयच्या जातीवरून देखील ऑर्डर नाकारली जातं असल्याच पाहायला मिळत आहे.

असच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. तेलंगणामध्ये ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडे आपले जेवण न पाठवण्याच्या कडक सूचना रेस्टॉरंटला दिल्या, हे प्रकरण व्हायरल झाल्यावर यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे. सध्या या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

https://twitter.com/ShaikTgfwda/status/1564650932763144192?s=20&t=ECBlgjXM3TsP3F7RyEPgHA

वाचा नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण हैदराबादमधून समोर आलं असल्याची माहिती मिळत आहे. एका व्यक्तीने रेस्टॉरंटला स्पष्ट आदेश दिले की कोणत्याही मुस्लिम डिलिव्हरी बॉयने त्यांचे जेवण पोहोचवू नये. यावरून आता सोशल मिडियावर वादंग निर्माण झाला आहे. यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणी शेख सलाउद्दीन, अध्यक्ष, तेलंगणा राज्य टॅक्सी आणि ड्रायव्हर्स JAC यांनी ग्राहकाने दिलेल्या आदेशाचे स्क्रीनग्राब सोशल मिडियावर शेअर केले आहे. शेख सलाउद्दीन नावाच्या युजरने ट्विट करत म्हंटलं आहे की, ‘Swiggy कृपया एवढ्या मोठ्या विनंतीविरुद्ध भूमिका घ्या. डिलिव्हरी बॉयचे काम अन्न पोहोचवणे हे आहे, मग ते हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख असो.’

दरम्यान, काही दिवसांपूर्वी असच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. ग्राहकाने फूड डिलिव्हरी बॉयची जात विचारून जेवण घेण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. एका व्यक्तीनं जातीवाचक शब्दात संबोधित करत दलिताच्या हातातील अन्न घेण्यास नकार दिला होता.

हे प्रकरण नवीन असतानाच अशातच आणखी एक प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. असं म्हणतात की, अन्नाला कोणताही धर्म नसतो.. मात्र अलीकडे जगात काही लोकं याकडे देखील धर्माच्या नजरेने पाहू लागले आहेत. यामुळे असे प्रकार घडू लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बंडखोर आमदार जयंत पाटलांच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सांगितली ‘अंदर की बात’
उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार म्हणणारे माजी खासदार शिंदे गटात सामील
Asia Cup: काय आहे जय शहा आणि तिरंगा वादाचे संपूर्ण सत्य? भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असं काय घडलं?
PHOTO: २९ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण, १७ वर्षात १० चित्रपट, आता ४६ व्या वर्षी केले बोल्ड फोटोशूट
इतर ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now