Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एक फोटो सोशल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. २५ पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावण्यात आला असून तो व्हायरल केला जात आहे. याप्रकरणी भाजप समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
नुकतीच आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर श्रीगणेश आणि लक्ष्मीचे फोटो छपण्याची मागणी केली होती. दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे. या परिस्थितीत देवाच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. त्यामुळे आता नोटांवर महात्मा गांधींच्या फोटोबरोबर श्रीगणेश आणि लक्ष्मीचे फोटोसुद्धा छापण्यात यावे, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली होती.
यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. तसेच त्यांनीही नोटांवर वेगवेगळे फोटो छापण्याची मागणी केली. यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे अशा अनेक नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला गेला.
या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा २५ पैशाच्या नाण्यावरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून त्यांना प्रचंड ट्रोल केले गेले. त्यामुळे आता कोकणातील भाजप आणि नारायण राणे यांच्या समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तसेच त्यांनी कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे. याबाबदल बोलताना तेथील स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले की, अशोकस्तंभाच्या जागी नारायण राणेंचा फोटो लावून अशोकस्तंभाची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे त्यांने सांगितले.
https://www.facebook.com/100030269047488/posts/pfbid02Y5fHFbyjeHVLiseEmHhd8nnJFMY3AkEMbWKcJt9iu7WPM3AFX4S6nHzmnBqL1tTZl/?app=fbl
तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील नेत्या अयोध्या पौळ यांनीदेखील नारायण राणेंचा हा फोटो शेअर केला आहे. अशा प्रकारे नारायण राणेंचा फोटो एडिट करून व्हायरल केल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
MIM पक्ष उद्धव ठाकरेंसोबत युती करणार? इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Saamana : भाजप आणि शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार? सामनातून केलेल्या ‘या’ आवाहनानंतर चर्चांना उधान
Aditya Thackeray : ‘आपले मुख्यमंत्री दहीहंडी, गणपती मंडळ अन् फोडाफोडी सोडून दुसरं काहीच करत नाहीत’
ajit pawar : टाटा-एअरबसवरून अजितदादा भडकले; राज्य सरकारचं भांडं फोडत केली शिंदे – फडणवीसांची बोलती बंद