अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. मलिक यांच्या सुटकेसाठी आघाडी पुर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. मलिक यांच्या अटकेच्या दुसऱ्या दिवशीच या प्रकरणाचा तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची मॅरेथॉन बैठक पार पडली.
या पार्श्वभुमीवर आज अशोक चव्हाण एक महत्वपुर्ण घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांच्या सुटके संबंधातच ही घोषणा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मॅरेथॉन बैठक वर्षा या शासकीय निवासस्थानी पार पडली.
या बैठकीत नवाब मलिक यांच्या सुटकेविषयी आणि इतर महत्वपुर्ण मुद्दयांवर चर्चा झाली. दुसऱ्या बाजुला आघाडी मलिकांचा राजीनामा घेईल की नाही या मुद्दयावर देखील चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु अद्याप कोणतीही ठोस अशी माहिती समोर आलेली नाही.
यासगळ्यात मलिक यांच्या सुटकेसाठी चारी बाजुंनी प्रयत्न सुरु आहेत. अशा स्थितीतच अशोक चव्हाण आज कोणती मोठी घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काल उपमुख्यमंत्री अजित पवारसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन पुकारले.
नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदवत सकाळी १० वाजल्यापासून महाविकास आघाडीचे नेते आंदोलनाला बसले होते. यावेळी भाजपच्या दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊन मोर्चा काढणार असल्याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी दिली. सध्या नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत.
गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयाने मलिक यांना घरचे जेवण आणि औषधे देण्याची परवानगी दिली आहे. यामुळे मलिक यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. कोठडीत राहत असताना मलिक यांना काही सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी मलिक यांच्या वकीलाने न्यायालयात केली होती. त्याची हिच मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘युद्ध नको बुद्ध हवा’, प्रख्यात लेखकाची फेसबुक पोस्ट चर्चेत, लोकांना दिला मोलाचा संदेश
“मलिकांना अटक झाल्यावर थयथयाट करणारे एसटीचा संप मिटवण्यासाठी काहीच का करत नाहीत?”
शाळेत मोबाईल वापरताना शिक्षिकेने पकडले, विद्यार्थ्यांना दिली भयंकर शिक्षा, व्हिडीओ पाहून अवाक व्हाल
द्रविड-गांगुलीशी पंगा घेणं वृद्धिमान साहाला महागात पडणार, BCCI करणार ‘ही’ कारवाई,