Share

महाराष्ट्रातील एसटी बसला मध्य प्रदेशात भीषण अपघात; अपघाताचा थरार वाचून उभा राहील अंगावर काटा

crime news

अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. ही अपघाताची बातमी मध्य प्रदेशमधून येत आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेकांनी आपला जीव गमवला आहे. या अपघाताने परिसरात देखील खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या अंमळनेरकडे ही बस निघाली होती. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास घडली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर पंधऱा प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले आहे. अपघातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या भयानक अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, अपघातानंतर मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरजवळ अपघात झालेली एसटी बस  MH 40 N 9848 ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आगारची असल्याची माहिती मिळालीआहे. ही बस सकाळी 7.30 ला इंदूरमधून अमळनेरच्या दिशेनं रवाना झाली होती.

याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितलं की, “आम्ही दुर्घटनेची सविस्तर माहिती घेत आहोत. महाराष्ट्र राज्यातील किती प्रवासी होते याची माहिती मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. १३ मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. असं त्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘अरे मंत्रिपद काय घ्यायचं, मी स्वतःला मुख्यमंत्री समजतो,’ मुख्यमंत्री शिंदेंसमोरच बंडखोर आमदाराने थोपटले दंड
सुष्मितासोबतच्या नात्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना ललित मोदींनी सुनावले; म्हणाले, मी अजूनही मध्यम वयात…
शिंदे सरकारची घटीका भरली? सर्वोच्च न्यायालय ‘या’ तारखेला ठरवणार शिंदे सरकारचे भवितव्य
नगरच्या पठ्ठ्याच्या ‘या’ जुगाडावर आनंद महिंद्रा सुद्धा झाले फिदा; फोल्डिंग जिना पाहून म्हणाले…

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now