Share

VIDEO: सासरी जाण्याआधी नवरीने एक्स-बॉयफ्रेंडसाठी रडत रडत गायले गाणे, नवरदेवही झाला शॉक

Marriage, Video, Bride, Ex Boyfriend/ लग्न (marriage) हा कोणत्याही मुलासाठी किंवा मुलीसाठी खास दिवस असतो. लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. मात्र लग्नानंतर तुम्हाला तुमच्या एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडची आठवण येत असेल तर? असे होणे जवळपास अशक्य असले तरी काही लोक असे असतात जे आपल्या प्रेमीला जळवण्यासाठी दुसऱ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. या वधूबाबतही असेच झाले आहे.

एका नववधूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लग्नानंतर तिच्या माजी प्रियकरासाठी गाणे गाताना दिसत आहे. मनोरंजक गोष्ट अशी आहे की वधू तिच्या भावी पतीसमोर तिच्या माजी प्रियकरासाठी गाणे गाते. यादरम्यान वराची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.

हा व्हिडिओ यूट्यूबवर अनेक वेगवेगळ्या चॅनेलवर उपलब्ध आहे. आम्ही दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लग्नासबंधीची अनेक किस्से पाहायला मिळतील. तसेच क्लिपच्या शेवटी तुम्हाला वधूने एक्स प्रियकरासाठी गायलेल गाणं ऐकायला मिळेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती मुलगी वधूचा पोशाख घालून बसली आहे आणि तिला तिच्या एक्स प्रियकरासाठी गाणे म्हणायचे आहे.

जेव्हा तिला तिच्या एक्स प्रियकराचे नाव विचारले जाते तेव्हा ती म्हणते, “मी एक्स प्रियकराचे नाव घेऊ शकत नाही, तो बदनाम होईल.” यानंतर मुलीला विचारले जाते की, ती कोणते गाणे गाणार आहे, त्यावर ती म्हणते, “जीती थी जिसके लिए”. यानंतर मुलगी माईक घेऊन गाणे म्हणू लागते आणि जवळ उभा असलेला तिचा वर तिच्याकडे बघतच राहतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “असे गाणे ऐकून कोणताही मुलगा पळून जाईल”. तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, “वराची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. मला वराबद्दल वाईट वाटते”.

व्हिडीओमध्ये तरुणी असेही म्हणताना दिसत आहे की, तिने हे लग्न आपल्या प्रियकराला जळवण्यासाठीच केले आहे. त्याचवेळी ती ज्या पद्धतीने रडत हे गाणे गात आहे, ते पाहून लोकांना त्यांच हसू आवरता येत नसलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा.

महत्वाच्या बातम्या-
रात्री सप्तपदी घेतली आणि सकाळी लग्नच मोडले; नववधूने सांगितलेलं कारण ऐकून बसेल जबर धक्का
Rajasthan : लग्नानंतर सहा दिवसातच नववधूने केला ‘हा’ भयानक कांड; वाचून पायाखालची जमीन सरकेल
VIDEO: डोळ्यात अश्रू अन् हातात फोटो घेऊन मंडपात पोहोचली नववधू, उपस्थित सर्व वऱ्हाडी झाले भावूक

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now