शिवसेनेत शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आता पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्राला भरती आली आहे. त्यामुळे मातोश्रीवरून या जागी नव्या लोकांच्या नेमणुका केल्या जात आहेत. याचप्रकारे कल्याणच्या जिल्हाप्रमुखपदी आनंद दिघेंचे विश्वासू राहिलेले ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली आहे.(A bitter Shiv Sainik from Dighe’s training has been appointed as Kalyan Zilla Pramukh)
कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी आधी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर अचानक पलटी मारली. एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळत जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या रिक्त पदावर निष्ठावान जुन्या शिवसैनिकाची अर्थात थरवळ यांची नियुक्ती उद्धव ठाकरेंनी केली.
४२ वर्ष शिवसेनेत असलेल्या थरवळ यांनी अनेक मोठ्या, महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. आता कल्याण, डोंबिवली ग्रामीण भाग, कळवा, मुंब्रा या विधानसभा मतदारसंघातील भागाचे काम सदानंद थरवळ बघणार आहेत. डोंबिवली येथील शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नातील रामनगर प्रकल्प पूर्ण करण्यात सदानंद थरवळ यांचा मोठा वाटा आहे.
पूर्वी स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. डोंबिवलीचे २ वेळा ते शहरप्रमुख होते. त्यांनी अनेक लोकहिताची कामे त्यादरम्यान केली. आनंद दिघे यांचे विश्वासू दुत अशी थरवळांची ओळख होती. अनेक महत्त्वाच्या निवडणुकांसंदर्भातील निर्णय आनंद दिघे थरवळ आणि मटंगे यांच्याशी चर्चा करण्याअंती घेत असत, असे बोलले जाते.
आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कल्याण, डोंबिवलीसह अंबरनाथ, उल्हासनगर या ठिकाणाहून अनेक शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन केले. अनेक नगरसेवक त्या गटात जाऊन सामील झाले.
त्यानंतर ठाकरेंच्या निष्ठावान गटातील सुभाष भोईर, सदानंद थरवळ, प्रभाकर चौधरी, तात्या माने, भैया पाटील, रमेश जाधव यांनी उद्धव ठाकरेंना भेटून त्यांच्यासोबत कायम असल्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आणि आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्ठावान, सरळमार्गी अशी सदानंद थरवळ यांची ओळख आहे.
महत्वाच्या बातम्या-
नशीब! पेंटरवर होतं लाखोंचं कर्ज, घर विकायच्या दोन तास आधी लागली ‘एवढ्या’ कोटींची लॉटरी
साधूच्या वेशात नंदी बैलासोबत हिंडून भिक्षा मागणाऱ्या मुस्लिम तरुणांना बजरंग दलाकडून बेदम मारहाण
उदयनराजेंना न घाबरता टक्कर देणारा, लाखात मते घेणारा ठाकरेंचा वाघ शिंदे गटात सामील