Share

Corona Pandemic: कोरोना अनुदानातील मोठा घोटाळा झाला उघड; वाचून तुम्हीही हादराल

corona death

कोरोना महामारी(Corona Pandemic): संपूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटात असताना सरकारने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लोकांना मदत केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचे मृत्यू झाले. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. याबाबत एक माहिती उघडकीस आली आहे. ती म्हणजे सानुग्रह अनुदान हे एकाच व्यक्तीच्या नातलगाच्या खात्यात दोन ते तीन वेळा जमा झालेलं आहे.

एकाच मृत व्यक्तीच्या विविध नातलगांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. हे अनुदान वितरित करण्यासासाठी सरकारने सॉफ्टवेअर विकसित केले होते. त्या सॉफ्टवेअरमध्ये एकाच व्यक्तीचे नाव वारंवार येत गेले. त्यामुळे हा घोळ झाला. एकाच व्यक्तीच्या नातलगांचे अर्ज किती, हे शोधू शकेल अशी सुविधा त्या सॉफ्टवेअरमध्ये नसल्याने अधिकच घोळ झाला.

सानुग्रह अनुदानाची रक्कम प्रति व्यक्ती ५० हजार रुपये अशी देण्यात आली होती. याबाबतची तब्ब्ल २०५३ प्रकरणे समोर आली आहेत. १० कोटी २६ लाख रुपये इतकी रक्कम अतिरिक्त देण्यात आली आहे. २०५३ प्रकरणांपैकी ६४ प्रकरण वर्धा जिल्ह्यातील आहे. प्रशासनाने आता आवाहन केले आहे की, ज्यांच्या खात्यात पुन्हा पुन्हा रक्कम जमा झाली त्यांनी ती परत करावी.

सात दिवसाच्या आत रक्कम परत न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे उपसचिव संजय धारुरकर यांनाी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. या आदेशानुसार एकट्या वर्धा जिल्ह्यातून ३१ लाख ५० हजार रुपये मागण्यात येत आहे. सोनुग्रह योजना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सुरु केली होती.

याकरिता वर्धा जिल्ह्यातून २ हजार ४९८ अर्ज ऑनलाईन दाखल झाले होते. त्यातून १७२ अर्ज रद्द करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुसऱ्या तपासणीत २७१ अर्ज रद्द करण्यात आले होते. सानुग्रह योजनेप्रमाणेच अनेक योजना राबवण्यात आल्या होत्या. कोरोना काळात सरकारने हवी तेवढी मदत लोकांना केली.

केंद्र सरकारने मोफत अन्न योजना, वंदे भारत योजना, राज्यामध्ये रोजगार योजना यासारख्या अनेक योजना राबविल्या. काही योजनांच्या नावाखाली अनेकांची फसवणूकही झाली. सोशल मीडियावर याबाबतीत अनेक पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. कोरोनामध्ये विधवा झालेल्या महिलांना प्रति वर्ष ५० हजार मिळणार अशी अफवाही पोस्ट मधून पसरवण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या
‘आपण इथे पैसे खायलाच बसलोय, पैसे खाणे आपला अधिकार’; ग्रामसेवकच देतोय सरपंचाला भ्रष्टाचाराचे धडे
Ganesh Festival: राज्य सरकार गणपती मंडळांना देणार ५ लाखांचे बक्षीस; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Madhya Pradesh: घर पाडताना कामगारांना मिळाला सोन्याची खजिना, गुपचूप वाटूनही घेतला पण नंतर मात्र…
Madhya Pradesh: घर पाडताना कामगारांना मिळाला सोन्याची खजिना, गुपचूप वाटूनही घेतला पण नंतर मात्र…

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट राज्य

Join WhatsApp

Join Now