shivsena : शिवसेनेमध्ये बंड होऊन अडीच महिन्याहून अधिक कालावधी लोटला. मात्र शिवसेनेत अजूनही गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. धडाधड एकामागून एक आमदार, खासदारांच्या पाठोपाठ आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी सुद्धा शिंदे गटाची वाट धरत आहेत. हे चित्र शिवसेनेची डोकेदुखी अधिक वाढवणारे असल्याचे बोलले जाते.
या प्रकारेच शिवसेनेच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या मागे आता घाटकोपरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. घाटकोपरच्या वार्ड क्रमांक १३३ मध्ये ते नगरसेवक होते. कदम यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याआधी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बॅनरबाजी केली.
एक्सप्रेस हायवेवर त्यांचे बॅनर झळकले. त्यानंतर कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेला हा धक्काच म्हणावा लागेल. एकीकडे अनेक माजी आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांना हेरून खुद्द उद्धव ठाकरे त्यांना महत्त्वाची पदे देत आहेत. तर दुसरीकडे याच लोकांमध्ये अस्वस्थता पसरून त्यातले काही शिंदे गटाची वाट धरत आहेत.
शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादाबाबत न्यायालयात दाखल याचिकेवर अजूनही निर्णय आलेला नाही. तसेच मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावे. यासाठी निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जावरही अजून आयोगाचा निर्णय झालेला नाही.
अशा गोंधळलेल्या परिस्थितीत अनेक पदाधिकारी, नगरसेवक आहेत. मात्र येणाऱ्या निवडणुकीला लक्षात घेत शिंदे गटाकडे आजी-माजी नगरसेवकांचा जो वाढता ओढा आहे. तो शिंदे गटासाठी फायदेशीर ठरू शकतो.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्या आमदारांना आपल्या सोबत घेतले. त्याच आमदारांनी आपल्या मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक आपल्या बाजूने यावेत. यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे दिसते.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा गटप्रमुखांचा मेळावा घेत, पदाधिकाऱ्यांच्या सतत बैठका घेत सर्वांना एकजूट ठेवण्याचे अथक प्रयत्न चालू ठेवले आहेत. मुंबई महानगरपालिका काही झालं तरी आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे हे सर्वांना त्यादृष्टीने सतत संबोधित करताना दिसतात.
महत्वाच्या बातम्या-
Team india : भारतानं हरवलं ऑस्ट्रेलियाला पण मिरची लागली पाकिस्तानला, वाचा काय घडलं..
Tanaji Sawant : ‘दोन वर्षे गप्प होता पण सत्तांतर झाल्यावर तुम्हाला लगेच आरक्षणाची खाज सुटली’
uddhav thackeray : उद्धव ठाकरेंवर अशीही निष्ठा, दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांचे परफेक्ट प्लॅनिंग; घेतला मोठा निर्णय