bhagat singh koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या विधानांनी चर्चेत असतात. अनेकदा राज्यपाल कोश्यारी हे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले आहेत. पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांनी एक मोठं वक्तव्य करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
नुकतच राज्यपाल कोश्यारी यांनी देशाच्या इकॉनॉमीवर भाष्य केलं आहे. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ५ ट्रिलियन्स इकॉनॉमीचा विचारही सांगितला आहे. ते काल नागपूरमधील सुरेश भट सभागृहात आयोजित भारत विकास परिषदेच्या संमेलनात बोलत होते.
वाचा काय म्हंटलं आहे राज्यपाल कोश्यारी यांनी..?
“सर्वांनी मदत, संपर्क आणि सेवा या तीन गोष्टी केल्या, तर मोदींना वाटतं त्याआधीच भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची होईल. यात माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही,” असं मोठं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं आहे. सध्या कोश्यारी यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय बनलं आहे.
नुकतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं होतं की, आपली अर्थव्यवस्था लवकरच पाच ट्रिलियन डॉलरची होणार आहे. याचाच धागा पकडत आता कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘भारत विकास परिषदेत देशभरातील चांगले लोक असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.
याबाबत बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, “भारत विकास परिषदेत देशभरातील चांगले लोक आहेत. जो चांगला वकील आहे, चांगला डॉक्टर, चांगला दुकानदार असे अनेक व्यक्ति एकत्र बसतात, योजना तयार करतात. तसेच योजना करून देशभरात सेवेचं काम करतात. आपण ते काम किती पुढे नेऊ शकतो यासाठी प्रयत्न करायला हवे.’