घर मालकीणीने अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे भाडेकरूने तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने महिलेचा बाथरूम मध्ये गळा आवळून हत्या केली, आणि नंतर फरार झाला. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात खळबळजनक वातावरणात निर्माण झालं आहे.
संबंधित घटना पुण्यातील येरवडा परिसरातील लोहगाव याठिकाणी रविवारी घडली आहे. एका 30 वर्षीय भाडेकरू तरुणानं आपल्या मालकीणीबरोबर अनैतिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. यावर महिलेनं विरोध केला. त्यामुळे, आरोपीने तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह बाथरूम मध्ये टाकून, घराला कुलूप लावून निघून गेला.
मृत महिलेचा पती आणि मुलं घरी आल्यानंतर त्यांनी घराला कुलूप पाहिले. त्यांनी चौकशी केल्यानंतर, महिलेला आवाज दिला. मात्र खूप उशीरापर्यंत घरातून आवाज न आल्याने दरवाजा फोडला. तेव्हा त्यांना बाथरूम मध्ये महिलेचा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला.
घटनेची माहिती पोलिसांना समजताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करून, आसपास चौकशी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, गुलाम मोहम्मद शेख असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा आहे. तो लोहगाव येथील मोझेआळी परिसरात मृत महिलेच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता.
दरम्यानच्या काळात, मृत महिलेचे आणि त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले. त्याची आणि महिलेच्या अनैतिक प्रेमसंबंधाबद्दल कुटूंबियांना समजताच त्यांनी आरोपी गुलाम शेख ला घर रिकामे करण्यास सांगितले. त्यावर आरोपीने घर रिकामे केले आणि तो लोहगाव येथे संत नगर परिसरात राहिला लागला.
घटनेच्या दिवशी रविवारी दुपारी तो मृत महिलेच्या घरी आला होता. यावेळी संबंधित महिला घरी एकटीच होती. त्याने महिलेकडं अनैतिक संबंधाची मागणी केली. पण, महिलेनं संबंध ठेवण्यास त्याला नकार दिला. त्यावर आरोपीनं महिलेचा गळा आवळला. तिचा मृतदेह बाथरूम मध्ये टाकला. घराला कुलूप लावून तेथून पळ काढला.
महिलेच्या कुटूंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,आरोपी गुलाम शेख विरोधात अनैतिक संबंधांना नकार दिल्याच्या कारणावरून, हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून, विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस आरोपीचा तपास करत आहेत.






