Share

Complaint: ३ वर्षांच्या मुलाने आईविरोधातच केली तक्रार दाखल, ऐकून पोलिस अधिकारीही झाला लोटपोट

‘बच्चे मन के सच्चे’ ही म्हण आपण अगदी लहानपणापासूनच ऐकत आलो आहे, म्हणजेच लहान मुल मनाने एकदम निर्मळ असतात, त्यांना कोण चांगले आणि कोण वाईट हेच कळत नसत. मात्र आता एक निष्पाप लहान मुलगा आपल्या आईची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. खरं तर हे संपूर्ण प्रकरण आहे मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Complaint, Madhya Pradesh, Video, Social Media, Police Station

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्याचवेळी पोलिसांनी मुलाच्या तक्रारीवरून गुन्हाही लिहून घेतला आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील देडतलाई पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. जेथे मुलाच्या सांगण्यावरून त्याचे वडील त्याला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी घेऊन पोहोचले.

मात्र जेव्हा पोलिसांना या तक्रारीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनाही हसू आवरता आले नाही आणि त्यांनी त्या निरपराधांच्या तक्रारीचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वडिलांसोबत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या मुलाने तिथल्या एसआय प्रियंका नायक यांना सांगितले की, आई माझी सर्व कँडी आणि चॉकलेट चोरते, मला आता तिच्यासोबत राहायचे नाही. तुम्ही तिला तुरुंगात पाठवा.

मुलाचे हे असे गुदगुल्या करणारे शब्द ऐकून तक्रार लिहिणाऱ्या एसआयशिवाय इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आपले हसू आवरता आले नाही. मुलाचा असा निरागसपणा पाहून तिथल्या एसआयनेही एक कागद पेन हातात घेतला आणि त्याची तक्रार लिहिण्याचा बहाणा केला. मात्र त्या निरागसाचे बोलणे ऐकून त्यांना हसू आवरता आले नाही.

https://twitter.com/ShakeelABP/status/1581925442755342336?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1581925442755342336%7Ctwgr%5E793de523d342260f46ca5fc7c2e3a27833370160%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fstates%2Fmadhya-pradesh%2Fmp-burhanpur-when-mother-slapped-her-on-cheek-3-year-old-son-reached-police-station-said-put-my-mother-in-jail-ann-2239999

यानंतर, तक्रारीचे लेखन पूर्ण झाल्यावर, त्यांनी मुलाला तक्रारीवर सही करण्यास सांगितले, तेव्हा त्याने अत्यंत निरागसपणे त्या कागदावर फक्त दोन रेषा काढल्या. यानंतर एसआय प्रियंका यांनी त्याची समजूत घातली आणि त्याला घरी पाठवले. काजळ घालत नव्हता म्हणून आई ओरडली त्यामुळे मुलाने पोलिसात तक्रार करण्याचा आग्रह धरला.

प्रत्यक्षात देडतलाई परिसरातील महिला या निरागस मुलाला अंघोळ करून काजळ लावण्याचा लावण्याचा प्रयत्न करत होती, मात्र मुलाला काजळ लावायची इच्छा नव्हती. यावर आईने सौम्य राग दाखवत तिच्या थोबाडीत मारली. संतापलेल्या मुलाने वडिलांकडे येऊन पोलिसांत तक्रार करण्याचा आग्रह धरला. सुरुवातीला आई-वडील त्याच्यावर हसले, पण तो ऐकत नसल्याने वडिलांनी त्याला पोलिस ठाण्यात नेले. आता त्यांच्या तक्रारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
rutuja latake  : ऋतुजा लटकेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल, त्यामुळे राजीनामा स्वीकारत नाहीये; पालिकेचा अजब दावा
Police Inspector: अनवाणी पायाने तक्रार देण्यासाठी आल्या आजी, इन्स्पेक्टरने केलं असं काही की लोकांची जिंकली मनं
Kishori Pednekar : शिवसेनेत अंतर्गत धुसफूस, किशोरी पेडणेकर नाराज? थेट उद्धव ठाकरेंकडे केली तक्रार

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now