Share

अवघ्या २५ वर्षाच्या तरुणीने ७० वर्षाच्या म्हाताऱ्याशी केलं लग्न; लग्नानंतर तरूणी म्हणाली…

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असे म्हणतात. प्रेमात पडल्यावर समोरच्या व्यक्तीचे वय किती याचा देखील विचार केला जात नाही. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका ७० वर्षे वयाच्या व्यक्तीने २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न केलं आहे. सध्या या जोडप्याची प्रचंड चर्चा होत आहे.

या पती आणि पत्नीच्या वयात तब्बल ४५ वर्षांचा फरक आहे. स्टेफनी आणि डॉन अशी या दोघांची नावं आहेत. वय हे आपल्या नात्याच्या आड कधीच येत नाही असे या जोडप्याचे म्हणणे आहे. तसेच आपल्यातील वयामुळे लोक आपल्याला काय म्हणतील याची पर्वा देखील नसल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पत्नी स्टेफनीने ‘लव्ह डोंट जज’ या एका शोमध्ये सांगितले की, त्यांचे कुटुंबीय त्यांच्या या नात्यावर खूश नाहीत. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. दोघांची भेट कशी झाली याबद्दल तिनं सांगितले की, ती डॉनला ५ वर्षांपूर्वी एका पबमध्ये भेटली होती.

स्टेफनी त्या पबमध्ये काम करत होती. डॉन जेव्हा कधी पबमध्ये यायचा तेव्हा तो खूप खूश व्हायचा. एकमेकांकडे पाहून दोघांनाही छान वाटायचं. तिथून दोघांमध्ये रोमान्स सुरू झाला. त्यांच्यात दिवसेंदिवस जवळीकता वाढली आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या लग्नाला कुटूंबीयांचा विरोध होता.

दोघांच्या वयात एवढा मोठा फरक असल्यामुळे कुटूंबातील लोकांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला. मात्र एकमेकांवर असलेल्या प्रेमामुळे त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही, आणि लग्न केलं. त्यांना आता २ वर्षांचा मुलगा देखील आहे. त्याचं नाव लाचलान आहे.

स्टेफनीने सांगितले अनेकांना डॉन हा लाचलानचे आजोबा वाटतात. जेव्हा लोकांना कळते ते त्याचे वडील आहेत तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते. लोकांना वाटते, डॉनच्या जीवनविम्याच्या पैशांसाठी मी त्याच्या सोबत लग्न केलं आहे. अनेक जण आमच्या नात्याबद्दल नको ती चर्चा करतात, मात्र आता आम्ही कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आमचे एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now