ऍमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात घनदाट जंगलांपैकी एक आहे. त्याला जगाचे फुफ्फुस देखील म्हणतात. या जंगलात अनेक रहस्ये दडलेली आहेत. असे देखील म्हटले जाते की, तिथे सोन्याचे शहर देखील आहे, ज्याला अनेक लोक शोधण्यासाठी गेले आहेत आणि ते परत आले नाहीत. सोन्याचे शहर मिळो या ना मिळो, पण शास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान येथे मध्ययुगीन काळातील पिरॅमिड आणि वसाहती सापडल्या आहेत.(Amazon Jungle, City of Gold, Pyramids)
या पिरॅमिड्सची उंची सुमारे आठ मजली उंच आहे. हे संशोधन जर्नल नेचरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. घनदाट जंगलात असा शोध लावणे खूप अवघड असले तरी नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचा शोध लागला आहे. लेसर मॅपिंगच्या तंत्रज्ञानाने हे आश्चर्यकारक रिसर्च पब्लिश केले आहे.
हेलिकॉप्टरवर लेझर मॅपिंग यंत्र बसवण्यात आले आणि ते जंगलाच्या अनेक भागांवर नेण्यात आले. उपकरणाने एक 3D प्रतिमा दिली ज्यामध्ये झाडे नाहीत पण जमिनीच्या अचूक आकृतीचा अंदाज लावू शकतो. या नवीन शोधामुळे १६व्या शतकात युरोपियन वसाहत होण्यापूर्वी अत्याधुनिक समाजांचा अभाव असल्याची धारणाही कमकुवत झाली आहे.
संशोधकांनी असे उघड केले आहे की, प्राचीन ऍमेझॉनियन लोकांनी सुमारे १५०० वर्षांपूर्वी ते बांधले होते आणि ते दाट लोकवस्तीच्या भागात राहत होते. त्यात २२ मीटर उंच मातीचे पिरॅमिड होते. त्यामुळे लोकवस्तीचा परिसर अनेक किलोमीटर लांबीच्या रस्त्यांनी जोडला गेला. या संशोधनाशी संबंधित कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीचे पुरातत्वशास्त्रज्ञ ख्रिस फिशर सांगतात की, आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीने अमेजनमध्ये स्थायिक झालेली सभ्यता पाहायचो, ती त्यापेक्षा खूपच वेगळी आहे.
फिशर पुढे म्हणाले की, आतापर्यंत असे मानले जात होते की येथे राहणारे लोक मर्यादित सामाजिक विकास आणि शेतीसह लहान गटांमध्ये राहतात. पण या ठिकाणांच्या शोधामुळे ही धारणा बदलली आहे. यावरून हे कळाले की या छोट्या जमाती नसून शहरे होती. २०१९ मध्ये, जर्मनी आणि ब्रिटनच्या संशोधकांनी हेलिकॉप्टरद्वारे ७७ चौरस मैल क्षेत्र स्कॅन केले. बोलिव्हियामध्ये २६ वस्त्या सापडल्या आहेत, त्यापैकी ११ अद्याप ज्ञात नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
घृणास्पद! चार शिकाऱ्यांनी जंगलात घुसून केला या मुक्या प्राण्यावर बलात्कार, व्हिडीओही काढला
ट्रेकींगसाठी लोणावळ्यात गेलेल्या तरूणाचा मृतदेह जंगलात सापडला; शोधणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते
दोन मुलांसह आपल्या इंजिनीअर पतीला नक्षलवाद्यांपासून सोडवण्यासाठी जंगलात गेली पत्नी, वाचा पुर्ण किस्सा
प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पोटच्याच मुलीला जंगलात सोडले; आईच्या नावाला काळीमा फासणारी घटना