Share

Temples: ‘या’ ठिकाणी मिळाले १३०० स्क्वेअर फुटचे तब्बल १६०० वर्षे जुने मंदिर, समोर आली आश्चर्यकारक माहिती

गेल्या 11 वर्षांपासून पश्चिम आशियातील युद्ध आणि दहशतवादाने उद्ध्वस्त झालेल्या सीरियामध्ये जवळपास 1,600 वर्षे जुनी इमारत सापडली आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेले शतकानुशतके जुने ऐतिहासिक मोझॅक हे मंदिर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांनी सांगितले की, हजारो वर्षांनंतरही त्याचा मजला अगदी नवीन दिसत आहे. West Asia, Archaeologists, Mosaics, Temples

जरी पूर्वी इंडोनेशिया, व्हिएतनाम, बांगलादेश, पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये देखील मंदिरे सापडली आहेत. पण सीरियात सापडलेले हे प्राचीन मंदिर पुरातत्व विभागासाठी दुर्मिळ यश मानले जात आहे. हे मोझॅक रोमन काळात तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, हे मोझॅक सीरियातील तिसरे मोठे शहर होम्सच्या जवळ असलेल्या रास्तानमध्ये सापडले आहे.

सुमारे दशकभरापासून सुरू असलेल्या युद्धग्रस्त सीरियामध्ये अनेक पुरातत्व खजिन्याचे नुकसान झाले आहे. सध्या या अनोख्या नमुन्यात काही प्राचीन लढवय्येही दाखवले आहेत. हे मोझॅक 1,300 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. हे मोझॅक जुन्या इमारतीत पुरलेल होत. सीरियात सापडलेल्या या मोझॅकवर रोमच्या देवांचे चित्रणही आहे.

अशा स्थितीत असा अंदाज वर्तवला जात आहे की येथे पूर्वी मंदिर होते. तसेच येथे राहणारे लोक रोमन देवतांची पूजा करत असत. विभागाचे सहयोगी संचालक डॉ. ह्युमन साद यांनी सांगितले की, या मोझॅकमध्ये समुद्रातील प्राचीन रोमन देव नेपच्यून आणि त्याच्या 40 साथीदारांचे चित्रण केले आहे.

डॉ. साद म्हणाले की, हे मोझॅक कोणत्या इमारतींवर बनवले जातात, हे अद्याप शोधण्यात आम्हाला यश आलेले नाही. उत्खननाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, अशा स्थितीत येथून आणखी काही दुर्मिळ वस्तू मिळण्याबरोबरच आणखी मोठे खुलासे होऊ शकतात. विशेष म्हणजे, एका दशकाहून अधिक काळच्या लढाईत लाखो मूळ रहिवासी विस्थापित झाले आहेत.

11 वर्षात लाखो लोक उपासमारीने आणि आजारांनी मरण पावले आहेत. प्रदीर्घ काळापासून त्रस्त असलेल्या या देशात झालेल्या युद्ध आणि रक्तरंजित संघर्षात देशाच्या अनेक वारसा लुटल्या आणि विकल्या गेल्या किंवा पाडल्या गेल्या. आता गेल्या काही वर्षांपासून येथील सरकार काही भाग वाचवून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या-
Vegetarian Crocodile : अनंतपद्मनाथ स्वामी मंदिरातील एकमेव शाकाहारी बब्बय्या मगरीचे निधन, प्रसाद खाऊन भरायची पोट
Cat: भारतातील असे अनोखे मंदिर जिथे गेल्या १००० वर्षांपासून केली जाते मांजरांची पुजा, कारण वाचून आश्चर्य वाटेल
Ram Temple : २०२३ मध्ये बांधकाम पुर्ण झाल्यावर कसे दिसेल भव्य राममंदिर? ट्रस्टने शेअर केले खास फोटो

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now