Share

१३ बेडरूमचं घर, लक्झरी गाड्या आणि बरंच काही मागे सोडून गेला शेन वॉर्न, संपत्तीचा आकडा वाचून डोळे फिरतील

जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनानंतर त्याची लाइफस्टाइल, त्याची संपत्ती याबद्दल जगभरात चर्चा सुरू आहे.

शेन वॉर्नला वेगाचं प्रचंड वेड होतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्झरिस कार आहेत. त्याच्या कलेक्शन मध्ये फेरारी, लॅम्बॉर्गिनी, दोन सीट्सची F Type ची गाडी आहे. या गाड्या अत्यंत महागड्या आहेत. तसेच त्याच्याकडे Bentley Continental Super sports कार देखील आहे. एवढेच नाही तर बोलले जात आहे की, दोन मर्सिडीज, दोन BMW आणि Holden VK Commodore याही गाड्या त्याच्याकडे आहेत.

शेन वॉर्नच्या नावावर 13 बेडरूमचं एक घर आहे. मेलबर्नमध्येही त्याच्या नावावर पाच बेडरुम, पाच बाथरुम्स, उत्तम दर्जाच्या दारुचा स्टॉक असलेला आणि नाईटक्लबचा अनुभव देणाऱ्या बारसह आलिशान फ्लॅटही आहे. तसेच त्याने क्रिकेट कॉमेंट्रेटर आणि अनेक उत्पादनांच्या जाहिरातींमधून अब्जावधी रुपयांची संपत्ती कमावली होती.

राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये देखील त्याची काही प्रमाणात मालकी होती. अशी सगळी मिळून त्याच्याकडे 50 मिलियन डॉलर्सची म्हणजेच जवळजवळ 385 कोटी रुपयांची संपत्ती होती. त्याची एवढी सारी संपत्ती ऐकून नक्कीच सर्वांचे डोळे फिरतील. मात्र, एवढ्या सगळ्या संपत्तीला मागे ठेवून शेन वॉर्नला जगाचा निरोप घ्यावा लागला, याचे दुःख व्यक्त केले जात आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू वॉर्नने आपल्या कसोटी कारकिर्दीत 145 सामने खेळले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 708 विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमधील विकेट्सच्या बाबतीत तो श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन नंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. वॉर्नने जानेवारी 2007 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती.

शेन वॉर्नने शेवटची कसोटी जानेवारी 2007 मध्ये खेळली होती. 1999 मध्ये तो ऑस्ट्रेलिया संघाचा उपकर्णधारही बनला होता पण त्याला कर्णधार होण्याची संधी कधीच मिळाली नाही. या गोष्टीची त्याला खंत वाटत होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर, वॉर्नने प्रथमच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं होतं, आणि आयपीएलच्या पहिल्या सीजनचं विजतेपदही पटकावून दिलं होतं.

इतर खेळ

Join WhatsApp

Join Now