मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले अमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील शिवाजी चौकात तब्बल १२ वर्षीय मुलाने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा अडवला.
यावेळी या मुलाने नितीन राऊत यांच्याकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबतचे निवेदन पत्र दिले. त्यावर राऊत यांनी देखील आम्ही लवकर यावर काही तरी मार्ग काढू असे आश्वासन मुलाला दिले. समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन राऊत बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अचानक त्यांची गाडी अडवण्यात आली.
त्यांची ही गाडी १२ वर्षीय मुलासोबत इतर मराठा बांधवांनी अडवली होती. या ताफ्याने गाडी अडवताच नितीन राऊत गाडीतून खाली उतरले. यानंतर त्यांना संभाजीराजेंच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मान्य करण्यासाठी गाडी अडवण्यात आल्याचे समजले.
यानंतर त्यांनी तेथील मराठा बांधवांशी संवाद साधला. तसेच राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल असे सांगितले. राऊत यांची गाडी अडवल्यामुळे परिसरात खळबळ माजली. यात पोलिसांची देखील चांगलीच दमछाक बघायला मिळाली. दरम्यान संभाजीराजे उपोषणाला बसल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक झालेले पाहिला मिळाले.
दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर तोडगा काढण्यासाठी ठाकरे सरकारकडून संभाजीराजे यांना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले. तब्बल ३ तासांच्या बैठकीनंतर राज्य सरकारने संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि सांस्कृतीक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन मागण्या पुर्ण केल्याची लेखी ग्वाही दिली आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चानेही संभाजी छत्रपती यांना पाठिंबा दिला होता. संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात जमले आहेत. आज तिसऱ्या दिवशी संभाजीराजेंची तब्येत बिघडली होती. त्यांची शुगर कमी होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या
शिवसेनेच्या बड्या नेत्याची आयकर विभागाकडून १०० तास चौकशी, २ कोटी रकमेसह कागदपत्रे केली जप्त
इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले, त्या तथ्यांनुसार.., राज्यपालांनी दिलं स्पष्टीकरण
“तिसऱ्या मुलासाठी पत्नीकडे रोज ऍप्लिकेशन देतो”, पतीच्या या उत्तरावर लाजली भाग्यश्री, पहा व्हिडीओ
५४ वर्षांच्या माधुरी दीक्षितचा हॉटनेस पाहून १६ वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ, पहा फोटो