Share

Rupali Chakankar on Rohini Khadse : स्वतःवर प्रसंग ओढवला तर वेळ कळते का? रोहिणी खडसेंच्या ट्विटवरून चाकणकरांचा चिमटा

Rupali Chakankar on Rohini Khadse : खराडी (Kharadi) येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या रेव्ह पार्टीवर (Pune Rave Party) पोलिसांनी २७ जुलै रोजी कारवाई केली. या कारवाईदरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत पोलिसांवर आणि कायद्यावर विश्वास असल्याचं म्हटलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी रोखठोक शब्दांत टोला लगावला.

रेव्ह पार्टीवरून पुन्हा राजकीय वाद

एका बाजूला हनीट्रॅप प्रकरणावरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील वाद सुरु असतानाच, पुण्यातील या पार्टीमुळे नवा राजकीय पेच उभा राहिला आहे. अटकेतील व्यक्ती हे भाजपचे (BJP) माजी मंत्री असलेल्या नेत्यांचे जावई असल्याने प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. यावरच प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे यांनी ‘योग्य वेळी सत्य समोर येईल’ असे लिहून मुद्दा शांत करण्याचा प्रयत्न केला.

रुपाली चाकणकरांचा पलटवार

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) पत्रकारांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “महाराष्ट्राने या पार्टीचे दृश्य पाहिले. या पार्टीत ड्रग्ज, गांजा यांचा मुक्तपणे वापर झाला. अशा पार्टीमुळे समाजात विष पसरतं आहे आणि भविष्यातील पिढी बिघडते आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील यावर मला विश्वास आहे. मात्र, जे राजकीय लोक अशा गोष्टी घडवतात, त्यांच्यावरही बंदी घातली पाहिजे.”

“दूध का दूध, पाणी का पाणी” कायद्याच्या आधारेच!

विरोधकांकडून हे प्रकरण ‘ट्रॅप’ असल्याचा आरोप होत असतानाच, चाकणकर म्हणाल्या, “मी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून संविधानावर विश्वास ठेवते. पोलिसांना तपासासाठी वेळ द्यायला हवा. मेडिकल रिपोर्ट येणार आहेत, पोलिसांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे सत्य काय आहे हे कायद्याच्या चौकटीतूनच बाहेर येईल.”

“स्वतःवर प्रसंग ओढवला की कळते…”

रोहिणी खडसे यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना चाकणकर म्हणाल्या, “महाराष्ट्र पाहत आहे की त्या कुठल्या गोष्टींची पाठराखण करत आहेत. न्यायप्रविष्ट प्रकरणं समजून घेणं, ही त्यांना कठीण जातंय का? पीडित महिलांना घेऊन त्यांनी अनेक वेळा पत्रकार परिषद घेतल्या, तेव्हा कायदा सगळं सांगेल, असं कुठे म्हणाल्या होत्या? आज स्वतःवर प्रसंग आलाय, म्हणून ‘वेळ येईल, सत्य समोर येईल’ म्हणत आहेत. दुर्दैव म्हणजे पीडितांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत होत्या, हे आता स्पष्ट होतंय.”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now