Skip to content
Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना बसणार धक्का? ओळखच पुसणार, महत्वाची माहिती आली समोर…

March 20, 2024 by Tushar P

सध्या लोकसभेची तयारी सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नाव आणि पक्ष चिन्हावरुन देण्यात आलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या खटल्यात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर 14 मार्च रोजी सुनावणी पार पडली होती. यावेळी शरद पवार गटाच्या वतीने अजित पवारांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता. यावेळी हा फोटो वापरू नका, असेही सांगितले गेले होते.

न्यायालयाने तुम्ही आम्ही शरद पवारांचा फोटो वापरणार नाही असे लिखित द्या, असा आदेश अजित पवार यांच्या पक्षाला दिला होता. यामुळे अजित पवार गटाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करत शरद पवारांचा फोटो वापरणार नाही असे न्यायालयामध्ये सांगितले आहे. 

असे असताना अजित पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने घड्याळ दिलं असलं तरी आधीच्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाने पक्षचिन्हाबाबतीत वेगळा विचार करावा असं सांगितलं आहे. अजित पवार गटाला तुम्ही गोंधळ टाळण्यासाठी घड्याळाशिवाय एखाद्या वेगळ्या चिन्हाचा विचार का करत नाही? असे म्हटले होते.

आता यासंदर्भात अजित पवार गट काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, चिन्हामध्ये बदल केल्यास अजित पवार गटाला फटका बसू शकतो अशी चर्चा आहे. त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाने तुतारी हे चिन्हं स्वीकारले आहे.

अजित पवार गटाला चिन्ह बदलावे लावणार का.? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिन्ह बदलावं लागतं की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच पक्षाचं चिन्ह घड्याळ हेच आहे.

आता अजित पवार गटाला नवीन चिन्ह स्वीकारावं लागलं तर त्यांना ते मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी फारच मेहनत घ्यावी लागणार आहे. अजित पवार गटाला वेगळं चिन्ह वापरावं लागलं तर एक प्रकारे अजित पवार गटाची ओळखच पुसली जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या अजित पवार लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे.

Categories राजकारण Tags Ajit Pawar, party logo, Sharad Pawar, केंद्रीय निवडणूक आयोग
निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला शरद पवारांचा धक्का! आता गेम फिरणार? नेमकं घडलं काय?
EVM हटवण्यासाठी विरोधकांची जबरदस्त खेळी, निवडणूक आयोगही हतबल
© 2026 Mulukh Maidan • Built with GeneratePress