सध्या एका धक्कादायक प्रकरणी न्यायालयाने निर्णय दिला आहे. एक तरुणी ही मे २०१७ मध्ये आपल्या वडिलांसह काकाकडे गेली होती. काकाकडे वास्तव्यास असताना आरोपी चुलत भावाने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. तसेच ही गोष्ट कोणाला सांगू नको अशी धमकी दिली.
यामुळे तरुणीने याबाबत कुणाला काहीही सांगितले नाही. नंतर पीडित तरुणीला गर्भधारणा झाली. त्यामुळे पीडित तरुणीने याबाबत आपल्या आईला सांगितले. यामुळे मोठी खळबळ उडाली. ही बाब कळताच पीडित तरुणीच्या वडिलांनी आरोपी चुलत भावास आपल्या मुलीसोबत लग्न करण्याबाबत बोलणी केली.
असे असताना आरोपी चुलत भाऊ आणि त्याच्या वडिलाने लग्नास नकार दिला. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. याबाबत न्यायालयाने आरोपी वडिलांना चुलत भावास १० वर्षे कारावास, १० हजार रुपये दंडाच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
दरम्यान, अमरावतीमध्ये ही घटना घडली आहे. घरी आलेल्या चुलत बहिणीवर अत्याचार करणाऱ्या भावाला यामुळे न्यायालयाने मोठी शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. यामुळे पोलीस तपास करत होते.
दरम्यान, याबाबत जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने निकाल देत आरोपी भावाला १० वर्षाची शिक्षा दिली आहे. ही घटना ३० नोव्हेंबर २०१७ रोजी शेंदूरजनाघाट ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. यामुळे याचा तपास करून आता निकाल देण्यात आला आहे.
दरम्यान, यानंतर तिने बाळाला जन्म दिला. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. न्यायालयाने याबाबत अनेक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.