Share

कराडमधील युवकाने ड्रीम ११ मध्ये जिंकले १ कोटी अन् अख्ख्या गावाने सुरू केला राडा; पहा व्हिडीओ

Dream: ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेममध्ये कराडच्या एका युवकाने १ कोटी २० लाख रुपये जिंकले आहेत. सागर गणपतराव यादव असे या युवकाचे नाव असून तो काले येथे राहतो. सागर हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटूंबातील युवक आहे. लहानपणापासून त्याला क्रिकेटचे वेड होते. तसेच तो महेंद्रसिंग धोनीचा देखील फॅन आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून तो ड्रीम इलेव्हन ही गेम खेळत होता.

आयपीएल वरील खेळाचा योग्य अभ्यास करून सागर ड्रीम इलेव्हनवर आपली टीम करत होता. खूप वर्षे प्रयत्न करून देखील सागरला यश मिळत न्हवते. मात्र त्याने चिकाटी आणि जिद्द सोडली नाही. सखोल अभ्यास करून व सातत्य ठेऊन सागराला आता यश मिळाले आहे.

सागरने निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले असून त्याला चक्क १ कोटी २० लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. यामधील टीडीएस कट करून ८४ लाख त्याच्या खात्यावर जमा देखील झाले आहेत. सागरच्या या यशामुळे काले गावात जल्लोष सुरू आहे. दरम्यान सागरच्या आईवडीलांनी देखील आपल्या मुलाच्या यशानंतर आपला आनंद व्यक्त केला आहे.

“आम्ही शेतकरी कुटुंबातील असून एवढे पैसे एकदम मिळतील असे कधीही वाटले न्हवते. परंतु, सागरने मेहनत आणि अभ्यास करून हे यश मिळवले आहे. आम्हाला या गोष्टीचा खूप आंनद आहे. त्याने पाहिलेली सर्व स्वप्ने तो नक्की पूर्ण करेल.” अशी प्रतिक्रिया सागरच्या वडिलांनी दिली आहे.

सागर यादव हा सामान्य घरातील मुलगा असून आपली काही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तो ड्रीम इलेव्हन वर खेळत होता. एक ना एक दिवस आपण बक्षीस मिळवू या आशेवर सागरने खूप प्रयत्न केले आणि आता त्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. भविष्यात स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचे सागरचे स्वप्न होते. ते स्वप्न तो या पैशातून पूर्ण करणार आहे.

ड्रीम इलेव्हन मध्ये तुम्ही तुमच्या क्रिकेटमधील ज्ञानाचा वापर करून पैसे कमवू शकता. २०१६ मध्ये ही गेम सुरू झाली होती. यामध्ये तुम्हाला प्लेयर्सची टीम बनवावी लागते. जर तुम्ही निवडलेला प्लेयर चांगला असेल तर तुम्ही गेम जिंकून बक्षीस मिळवू शकता.

महत्वाच्या बातम्या

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now