Pankaja Munde: पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर दोघांमधली दरी वाढत गेली. बीड मधील कोणतीही निवडणूक असो ताई विरुद्ध भाऊ असा सामना ठरलेलाच असतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, समोरचा पॅनल हा फक्त त्यांची चोरी लपवण्यासाठी उभा आहे. कदाचित एक मेंबर बिनविरोध निघाला नसता. तर बऱ्याच जणांचा कार्यक्रम उरकला असता, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या सदस्य पदी पंकजा मुंडे यांची बिनविरोधी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर बोचरी टीका केली.
तसेच, मुंडे साहेबांची संस्थेसंदर्भातील स्वप्न त्यांच्यासोबतच गेली. बारा वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. वैद्यनाथ प्रभूंचं नाव आणि भ्रष्टाचार यामुळे मी निवडणुकीत उतरलो. मला माझ्या लोकांना मोठं करायचं आहे. ही निवडणूक प्रामाणिक भक्तांच्या अस्मितेची आहे. या नावाला कलंक लागणार नाही याची काळजी मी घेणार, असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
बीडच्या परळी येथील जवाहरलाल शिक्षण संस्थेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची बिनविरोधी निवड झाली आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची देखील या शिक्षण संस्थेत बिनविरोधी सभासद म्हणून निवड झाली आहे. यादरम्यान, आता बहिण भावामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे.
परळी येथील जवाहरलाल शिक्षण संस्थेवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची एक हाती सत्ता होती. तसेच, मागच्या लोकांनी कोणाच्या खात्यावर किती पैसे टाकले याबद्दल सर्व पुरावे माझ्याकडे असून ते मी देऊ शकतो. असे सांगत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेवर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी वैजिनाथ विकास पॅनलच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांना थेट आव्हान दिला आहे.
दरम्यान, स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून जवाहरलाल एज्युकेशन सोसायटी सुरू आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय शत्रुत्व असूनही या सोसायटीवर बिनविरोध निवड झाली कशी यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर नुकतेच गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या या आरोपांना पंकजा मुंडे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
…तोपर्यंत एकनाथ शिंदें यांचं मुख्यमंत्रीपद जाणार; अजितदादांनी केला मोठा गौप्यस्फोट
खारघर उष्माघात प्रकरणातील मृतांचा पोस्टमाॅर्टममधून धक्कादायक खुलासे; डॉक्टर म्हणाले, “त्यांच्या शरीरात…
अभिषेक-ऐश्वर्याच्या अवघ्या ११ वर्षीय मुलीची कोर्टात धाव; आराध्या बच्चनसोबत नेमकं काय घडलं?