Share

‘मला सलमान खानसोबत लग्न करायचय’; प्राजक्ता माळीने जाहीर केली इच्छा, कारणही सांगीतले, म्हणाली…

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajkta Mali) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या नव्या प्रोजेक्टमुळे, कधी तिच्या रोखठोक भूमिकांमुळे तर कधी तिच्या पोस्टमुळे. सध्याही ती तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. प्राजक्ता माळीने लग्नाविषयी एक मोठ वक्तव्य केले आहे.

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्री मधील एक अभिनेत्री आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत असते. अत्यंत बिंधास्त आणि दिलखुलास स्वभावामुळे प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता चहत्यांसोबत तिच्याबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर करत असते. नुकताच तिने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आला आहे. प्राजक्ता शूटिंगच्या बिझी शेड्युल मधून वेळात वेळ काढून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. प्राजक्ता नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती.

यावेळी प्राजक्ताने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना प्राजक्ताने तिला सलमान खान आवडायचा असे सांगितले. तुझा पहिला सेलिब्रेटी क्रश कोण? याचा खुलासा करताना प्राजक्ता म्हणाली, मला सलमान खान आवडायचा. मी अगदीच लहान होते. तेव्हा अगदी दोन-तीन वर्षांची असेल. माझ्या आतेभावाचा सलमान खान आवडता हिरो होता.

माझ्या आतेभावाने मला शिकवलं होतं. तेव्हा मी म्हणायचे मला सलमान खानची लग्न करायचं आहे. हे उत्तर देताना प्राजक्तालाही ते जुने दिवस आठवले. त्यावेळी ती खळखळून हसली. तिचं हे बोलणं सध्या खूप चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिला आधी वैभव तत्ववादी आवडायचा असे सांगितले होते.

कॉफी आणि बरच काही.. या चित्रपटापासून वैभव तत्ववादी प्राजक्ताचा क्रश होता. पण नंतर एका चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. आता वैभव तिचा क्रश राहिला नाही असेही तिने सांगितलं होतं. तर प्राजक्ताच्या पहिल्या क्रशच नाव वैभव तत्त्ववादी नसून बॉलिवूडचा दबंग सलमान खान आहे. प्राजक्ता आता खरच सलमान खानशी लग्न करणार का? असं प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

सर्वात मजा ब्रेकींग न्युज! आता भाजपमध्ये उमेदवारच उलथापालथ, जनताच गायब  
अर्जुनच्या संख्येने फिरवला सामना; बाप सचिन तेंडुलकराचा उर भरून आला, म्हणाला… 
कर्नाटक पाठोपाठ ‘या’ प्रदेशही भाजपचं टेन्शन विकास; ४० सदस्यांनी दिल्लीत ठोकला तळ

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now