17 मार्च रोजी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांनी विजयी खेळी संघाच्या झोळीत टाकली. या दोन्ही दमदार खेळींनी टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.
जड्डूने विजयी शॉट खेळून सामना संपवला. संघाने सामना जिंकल्यावर भारतीय चाहते आणि संघ व्यवस्थापक जल्लोषात होते. यानंतर टीमच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. टीम इंडियाने आपल्या खास स्टाईलमध्ये विजय साजरा केला. विजयाचा तो व्हिडीओ सद्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. चाहतेही या व्हिडीओला पसंत करत आहेत.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने 35.4 षटकांत 189 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाच्या टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरची कामगिरी अत्यंत खराब झाली. भारताचा निम्मा संघ 83 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा परिस्थितीत, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल संघासाठी संकटमोचक म्हणून धावून आले.
या दोघांनी शतकी भागीदारी करत संघाला जिंकवले. दरम्यान, जडेजाने षटकार आणि चौकार मारत संघाला विजयाच्या जवळ आणले. एवढेच नाही तर त्याने विजयी शॉट खेळून सामना संपवला. हा शॉट मारताच कर्णधार हार्दिक पंड्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला मिठी मारायला सुरुवात केली. संघाच्या या विजयाने केवळ भारतीय खेळाडूच नाही तर कांगारू खेळाडूही आनंदी दिसत होते.
https://twitter.com/RepublicCric/status/1636748612058087428?s=20
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर डगआउटमधून बाहेर आला आणि केएल राहुल आणि जडेजाला मिठी मारत मैदानावर आला. यानंतर त्यांनी मोहम्मद सिराजला शुभेच्छाही दिल्या. दरम्यान केएल राहुलने सोपा झेल सोडल्यानंतर हार्दिक पांड्या खूपच संतापला होता. दोघांची भांडणे पाहून स्टिव्ह स्मिथही खदाखदा हसला होता.
महत्वाच्या बातम्या
‘शिंदे गटात गेलेले सगळे परत येतील, पण ‘या’ व्यक्तीला पुन्हा कधीच शिवसेनेत घेणार नाही’
सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार? कायदेतज्ञ म्हणतात, ..तर ठाकरे गटाचेच आमदार अपात्र होतील
सत्तासंघर्षाची सुप्रीम सुनावणी संपली, कोर्ट काय निकाल देणार? उज्वल निकम म्हणाले, माझ्या मते..






