नाशिक, 17 मार्च : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सध्या मालेगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 26 मार्च रोजी मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत मालेगावात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोकणातील एका गावात सभा घेतली होती. यानंतर ते राज्यातील इतर ठिकाणीही सभा घेणार आहेत. संजय राऊत म्हणाले की, २६ मार्च रोजी मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे वगळता सर्वजण शिवसेनेत परत येतील, पण आम्ही एकनाथ शिंदे यांना स्वीकारणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आपण गद्दारांमध्ये नाही, असे म्हणत त्यांनी यावेळी दादा भुसे यांच्यावरही अप्रत्यक्ष हल्ला चढवला. राज्यातील मुस्लिम समाजही आमच्यासोबत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. आदिवासी रस्त्यावर आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यात सरकार आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
केव्हाही घरी जावे लागू शकते, हे माहीत असल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. २६ मार्च रोजी मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. एकनाथ शिंदे वगळता सर्वजण शिवसेनेत परत येतील, पण आम्ही एकनाथ शिंदे यांना स्वीकारणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहोत. जागावाटपावरून कोणताही वाद होणार नाही, याची ग्वाही मी देतो, महापालिकांबाबतही चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी मोठ्या महापालिका आहेत त्या ठिकाणी एकत्र लढायचे आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाची बातम्या
ना बॉडीगार्ड ना मोठेपणा! रतन टाटा नॅनो कारने एकटेच पोहोचले ताज हॉटेलला, पहा व्हिडीओ
‘शरद पवार गो बॅक’! पवारांच्या बालेकिल्ल्यातच शेतकऱ्यांनी दिला नारा; का चिडलाय बळीराजा? वाचा..
भाजपचा बालेकिल्ला ढासळला! कसब्यात कॉंग्रेसचे धंगेकर विजयी; लीडचा आकडा वाचून धक्का बसेल