Share

जगातील पहीली कोरोना लस बनवणाऱ्याला का ठार मारले? अखेर सत्य आले समोर, वाचून हादरला

रशियन कोविड लस स्पुतनिक व्ही बनवणारे शास्त्रज्ञ आंद्रे बोटीकोव्ह यांचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी बोटीकोव्हचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंटमधून सापडला. या शास्त्रज्ञाचा गळा दाबून खून झाल्याचे प्रथमदर्शनी पुरावे मिळाले आहेत.

यानंतर मॉस्को पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आंद्रे बोटीकोव्ह हे 47 वर्षीय रशियाच्या शीर्ष विषाणूशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. गमलेया नॅशनल रिसर्च सेंटरमध्ये स्पुतनिक व्ही लसीवर काम करणाऱ्या १८ विषाणूशास्त्रज्ञांच्या टीमचा तो भाग होता.

बोटिकोव्हला ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलैंड देखील मिळाले आहे. Sputnik V ही लस जगातील पहिली अँटी-कोविड लस मानली जाते. 2020 मध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका भव्य समारंभात हे लॉन्च केले होते. त्यांनी दावा केला होता की त्यांच्या लहान मुलीने या लसीचा डोस आधीच घेतला होता.

मात्र, त्यानंतर रशियाच्या या दाव्यावर अमेरिकेसह अनेक देशांनी शंका उपस्थित केल्या होत्या.  प्रथम लॉन्च करण्यात आले असूनही, जागतिक आरोग्य संघटनेने या लसीला बराच काळ मान्यता दिली नाही. भारताने रशियाकडून स्पुतनिक व्ही लस खरेदी करण्याचा करारही केला होता.

अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. आता रशियाची सर्वोच्च संस्था (रशियाची तपास समिती) या प्रकरणाची चौकशी करत आहे. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. भांडणाच्या कारणावरून या हल्लेखोराने शास्त्रज्ञाला बेल्टने मारहाण केल्याचा आरोप आहे.

आयसीआरच्या मॉस्को विभागाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की गुन्हेगाराचा तपास सुरू आहे आणि हल्लेखोराला कमीत कमी वेळेत अटक करण्यात आली होती. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

रशियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताचे नाव अलेक्से झेड असून त्याने यापूर्वी लैंगिक सेवा पुरवल्याबद्दल 10 वर्षे तुरुंगात घालवली आहेत. बोटीकोव्ह हे देशातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते आणि लसीवरील त्यांच्या कार्यासाठी त्यांना ऑर्डर ऑफ मेरिट फॉर फादरलँडने सन्मानित करण्यात आले.

स्पुतनिक व्ही लसीवर काम करण्यापूर्वी, बोटीकोव्ह यांनी डीआय इव्हानोव्स्की इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे रशियन स्टेट कलेक्शन ऑफ व्हायरसमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम केले.

महत्वाच्या बातम्या
प्रेयसीला अपमानास्पद बोलला म्हणून पोटच्या पोराने निर्दयीपणे चिरला बापाचा गळा, पुण्यातील घटना
मुख्याध्यापकाला चप्पलेने मारून समाधान नाही झाले, मग दांडक्याने चोपले..; महिलेच्या संतापाचे कारण वाचून हैराण व्हाल
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा सख्खा भाऊ ईडीच्या ताब्यात; राजकीय वर्तूळात खळबळ

आंतरराष्ट्रीय क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now