अगदी शुल्लक कारणावरून कोण कोणाचा जीव घेईल हे सांगन आता कठीण झालंय. अशीच थरकाप उडवणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सदर घटनेने मुलगा आणि वडील यांच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे वडिलांनी प्रियसीविषयी अपशब्द बोलल्यामुळे मुलाने आपल्या वडिलांचा खून केला आहे. संबंधित घटना पुणे जिल्ह्यातील अशोक जाधव ( Ashok Jadhav) यांच्या घरात घडली आहे.
अनिल जाधवचे गेल्या काही दिवसांपासून बाहेर एका मुलीशी अफेअर आहे. अशोक जाधव यांना दोन मुलं आहेत. अनिल जाधव आणि राहुल जाधव ही त्यांच्या दोन मुलांची नावे आहेत. वडिलांनी प्रियसी विषयी अपशब्द बोलल्यामुळे अनिल जाधवने संताप्त व्यक्त केली.
प्रियसी विषयी अपशब्द बोलल्याने संतापलेल्या अनिलने आपल्या वडिलांचा गळा आवरून खून केला आहे. यावेळी मुलाला चक्क आई आणि भावाने देखील साथ दिली आहे. या प्रकरणात वडील अशोक रामदास जाधव (वय ४५) यांचा मृत्यू झाला आहे.
अनिलने वडिलांचा खून केला. त्यानंतर भाऊ राहूल जाधव आई आणि अनिलने मिळून एक प्लॅन केला. त्यांना अशोक जाधव यांचा मृतदेह पंख्याला टांगून ठेवला. त्या तिघांनी मिळून अशोक जाधव यांनी स्वतः आत्महत्या केली अस दाखावण्याच प्रयत्न केला. यावेळी रक्ताने माखलेले कपडे आईने लांबपास केली.
तसेच, फरशीवर सांडलेले रक्त पुसून काढले. तिघांनी मिळून पुरावे नष्ट केले. त्यामुळे दिघी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयात हजर केले. १० मार्च पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.