Abhijit Bichukale: नुकतेच चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान पार पडले आहे. या दोन्ही निवडणूकांची चांगलीच चर्चा होती. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असल्याने सर्वांचे लक्ष या निकालाकडे वेधले होते. पोटनिवडणुकीचा निकाल आज( २ मार्च) जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजता मोजणी सुरू झाली असून कसब्याचा निकाल जाहीर झाला आहे.
कसब्यातील मतमोजणीच्या २२ फेर्या होणार असून चिंचवडमध्ये ३६ फेर्या होणार आहे. या फेऱ्यांमधील प्राथमिक निकाल जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या फेरीत काँग्रेसच्या रवींद्र दांडेकर यांनी मोठी आघाडी घेतली. पहिल्याच फेरीत त्यांनी ३००० मतांची आघाडी मिळाली. मात्र, यावर्षी पोटनिवडणुकीमध्ये नशिब आजमावण्यासाठी बिग बॉस फिल्म अभिजीत बिचकुले मैदानात उतरले आहेत.
तसेच ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. त्यामुळे सध्या या दोघांच्या नावावर किती मते पडली याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकीत आमचाच विजय होईल असा या दोघांचा दावा होता. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
नेटकरांनी अभिजित बिचुकले आणि आनंद दवे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक बिचकुले यांना सहाव्या फेरीत बोटावर मोजणे इतकं मत मिळाला आहे. त्यांना अवघी चार मते मिळाली आहेत. तर दुसरीकडे आनंद दवे यांना तिसऱ्या फेरीपर्यंत अवघी १२ मते मिळाली. तर सहाव्या फेरीत त्यांना १०० मते मिळाली. कसबा मतदारसंघातून अभिजीत बिचुकले उभा राहिल्याने ही निवडणूक खूपच रंजक होती.
अभिजीत बिचकुले यांनी सुरुवातीपासूनच माझा विजय होणार, असा दावा केला होता. मात्र, कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. निवडणूक म्हटलं की अभिजीत बिचकुले हे नाव चर्चेत येतच. त्याचं कारण म्हणजे राष्ट्रपतींची निवडणूक असो नाहीतर आमदारकीची अभिजीत बिचकुले हे निवडणूक लढवण्यासाठी नेहमीच इच्छुक असतात.
यादरम्यान, अभिजीत बिचकुले आनंदवे यांना पडलेल्या मतांवर चांगलीच चर्चा रंगली आहे. दोघांच्या मताची आकडेवारी अत्यंत निराशाजनक आहे. अभिजीत यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असूनही पहिल्या फेरीत फक्त ४ मते मिळाल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या–
- नागालँडमध्ये आलं निळं वादळ, RPI च्या आठवले गटाने रचला इतिहास, ‘इतके’ आमदार आले निवडून
- चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांना विजयी आघाडी; नाना काटेंच्या वाटेत कलाटेंचे काटे, वाचा नेमकं काय घडलं
- संजय राऊतांना अडकवण्याचा डाव फसणार? समोर आलेल्या माहितीने भाजप शिंदे गट तोंडावर आपटला






