ठाकरे गटाच्या हातातून शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गेल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निवडणूकीतील अडचणी सुद्धा वाढल्या आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरेंंनी सर्वाोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
तसेच आता उद्धव ठाकरे निवडणूक लढण्यासाठीही तयारीला लागले आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लढण्यासाठी इतर विरोधी पक्षांची मदत घेत आहे. त्यामुळे मातोश्रीवरही मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे.
भाजपला सत्तेपासून दुर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले आहे. भाजपला एकटं पाडायचं असेल तर विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे रणनिती बनवताना दिसून येत आहे. त्यामुळे शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान हे मुंबईत आले होते.
मुंबईत येऊन केजरीवाल आणि भगवान मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांच्यासोबतच मानही तिथे आले होते.
पक्षाचं नाव चोरीला गेलं, चिन्ह चोरीला गेलं, ते सगळं काही चोरी करुन नेलं. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो. उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते आणि उद्धव ठाकरे हे वाघाचे पुत्र आहे. संपुर्ण महाराष्ट्र त्यांच्या बरोबर आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे
तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे यांना नक्कीच न्याय मिळेल, अशी मला आशा आहे. येत्या निवडणूक उद्धव ठाकरेंना खुप चांगले यश मिळेल. महाराष्ट्राची संपुर्ण जनता त्यांच्यासोबत आहे, असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यामुळे आप आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुप्रीम कोर्टातील सत्तासंघर्षात कुणाची बाजू वरचढ? ठाकरे की शिंदे? उज्ज्वल निकम म्हणाले…
संजय राऊतला मारण्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप असलेला राजा ठाकूर आहे तरी कोण? जाणून घ्या…
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…