सोशल मीडियावर अनेकजण प्रसिद्ध होत आहे. विनोदी अभिनय, कला, नृत्य अशा गोष्टी ते सोशल मीडियावर सादर करत आहे. त्यानंतर त्यांना लोकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. असेच काही तरुण-तरुणी चला हवा येऊ द्यामध्ये आले होते. त्यामुळे आता ते पुन्हा चर्चेच आले आहे.
अथर्व सुदामे, धनंजय पोवार, कोकणची अंकिता यांच्यासोबतच अनेक रिल्सस्टार थुकरटवाडीमध्ये आले होते. त्यावेळी अनेकांनी आपआपल्या जीवनातील काही प्रसंग सांगितले. त्यातलाच एक म्हणजे धनंजय पोवार. धनंजय पोवारने त्याची कहानी सांगितली, ती खुपच भावूक करणारी होती.
धनंजय पोवारला सोशल मीडियावर डीपी म्हणूनही ओळखतात. तो त्याची आई, पत्नी आणि मुलांसोबत व्हिडिओ बनवतो. त्याचे चाहत्यांसोबतचेही काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध मिळालेला धनंजय हा मूळचा कोल्हापूरचा आहे.
धनंजयचे वडील गावात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आपल्या मुलाने असे विनोदी व्हिडिओ बनवू नये, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे दोनचारवेळा वडिलांनी त्याला त्याच्या बायको पोरांसोबत घरातून बाहेर काढले. अशात धनंजय आपल्या वडिलांची बोलणी खात राहिला पण त्याने व्हिडिओ बनवणे थांबवले नाही.
धनंजयला सोशल मीडियावर खुप प्रसिद्धी मिळाली. चाहत्यांचे, लोकांचे मिळणारे प्रेम पाहून त्याच्या वडिलांनी आपले मत बदलले. त्यानंतर त्याचे वडील सुद्धा काही व्हिडिओंमध्ये त्याच्यासोबत दिसून आले. त्याच्या व्हिडिओमुळे त्याच्या वडिलांनी त्याच्या हातात बॅग देऊन त्याला बाहेर काढले होते. पण आता तेच त्याच्यासोबत काही व्हिडिओंमध्ये दिसून येतात.
धनंजय पोवार यांचे कोल्हापूरमध्ये एक फर्निचरचे मोठे शोरुम आहे. तसेच तो एक स्पोर्ट वेअरचं शॉपही चालवतो. इतक्या सगळ्या गोष्टी असूनही त्याने व्हिडिओ बनवणे थांबवले नसून लोकांना हसवण्याचा प्रयत्न तो करत असतो. इंस्टाग्रामवर त्याला साडेसात लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहे.
महत्वाच्या बातम्या-
फोटोत नक्की आकडे किती आणि कोणते? ९९ टक्के लोकं झालं फेल, पहा तुम्हाला जमतंय का?
मविआ असताना १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन भाजपचा दबाव होता? कोश्यारींनी केला मोठा गौप्यस्फोट
‘हे’ आहेत पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत हिंदू, दोन तर आहेत सख्खे भाऊ; जाणून घ्या त्यांचा व्यवसाय आणि संपत्ती