व्यवसाय छोटा असो वा मोठा, तो आवडीने केला तर तो परतावाही कितीतरी पटीने देतो. देशात चहा विकण्याच्या काम लोक अगदी लहान मानत असले तरी चहा विकून अनेक जण कोट्यवधी रुपयांनी पैसा कमवत आहे. अनेकांनी तर त्यांच्या शाखा वेगवेगळ्या राज्यात देखील उघडल्या आहे.
चहा विकून बक्कळ पैसा कमवणाऱ्यांमध्ये तरुण उद्योगपती प्रफुल्ल बिल्लोरेचा पण नंबर लागतो. प्रफुल्ल हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. आता ते त्यांच्या कारमुळे चर्चेत आले आहे. चहा विकून प्रसिद्ध झालेल्या प्रफुल्ल बिल्लोरे यांनी स्वतःसाठी एक कोटी रुपयांची मर्सिडीज कार खरेदी केली आहे.
प्रफुल्ल यांना एमबीए चाय वाला म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी एमबीए सोडले होते आणि २०१७ मध्ये त्यांनी आयआयएम अहमदाबादच्या बाहेर चहाचे स्टॉल लावून ते विकण्यास सुरुवात केली. सध्या त्यांची देशभरात १०० हून अधिक आउटलेट आहेत.
नुकतीच त्यांनी एक कोटी रुपयांची मर्सिडीज कार खरेदी केली आहे. त्यांनी स्वत: त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कारची डिलिव्हरी घेतल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. इंस्टाग्रामवर त्यांचे १.५ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांचा व्हिडिओ चाहत्यांना आवडला आणि काही वेळातच तो व्हायरल झाला. त्यांनी मर्सिडीज बेंझ जीएलई ३००डी हे मॉडेल घेतले आहे.
https://www.instagram.com/p/CojxJRUDi_V/
याशिवाय प्रफुल्ल यांनी कारसोबत एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी लिहीले की, देवाचे आशीर्वाद, कुटुंबाचा पाठिंबा, सर्वांचे कष्ट आणि जगभरातील लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद. आज आम्ही नवीन पाहुणा म्हणून मर्सिडीज जीएलई ३००डी घरी आणली आहे.
मर्सिडीज-बेंझ जीएलई एसयूव्ही सर्व वैशिष्ट्यांसह आहे ज्याची तुम्हाला लक्झरी कारमधून अपेक्षा आहे. मर्सिडीज बेंझ जीएलई ३००डी मध्ये २-लिटर, चार-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. हे इंजिन २४५ PS आणि ५०० Nm पीक टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिन ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. कार ७.२ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग घेऊ शकते आणि तिचा वेग २२५ किमी प्रतितास आहे.
महत्वाच्या बातम्या-
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाने फेकला नवा ‘पत्ता’, शिवसेनेने ‘हे’ प्रत्यूत्तर देत काढली सगळी हवा
मुख्याध्यापकाने आपल्या स्वखर्चाने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना घडवला विमान प्रवास; वाचा भन्नाट किस्सा
ठाकरेंच्या पठ्ठ्याने करून दाखवले! फडणवीसांच्या खास आमदारासह अख्ख्या पॅनललाच लोळवले