Share

भाजपने उमेदवारी न दिल्याने मुक्ता टिळकांचे पती नाराज; अश्रू पुसत म्हणाले, पक्षाने अन्याय केला, आता….

हेमंत रासणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कुटुंबातीलच कुणाला तरी उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. आम्ही पक्षाकडे तिकिटांचीही मागणी केली होती. मात्र तिकीट दिले नाही.

का दिले नाही माहीत नाही? अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना शैलेश टिळक यांचा गळा दाटून आला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मुक्ता टिळक यांच्या आजारपणातील त्यांच्या कामावर अन्याय झाल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही पक्षासोबत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शैलेश टिळक यांनी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कसब्याची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सामान्यत: लोकप्रतिनीधीचा मृत्यू झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याच्या घरातील सदस्यालाच नैसर्गिकपणे उमेदवारी दिली जाते. मीही उमेदवारी मागितल्याचे शैलेश टिळक यांनी सांगितले.

दीड वर्षांचाच वेळ राहीला आहे. मुक्ता ताईंचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी घरातील कोणत्याही एका व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी मी केली होती. मात्र पक्षाने वेगळा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. मात्र तरी हे आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. उमेदवारीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीतून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. आज आणि उद्या याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

मुक्ताताईंचे निधन झाल्यावर मलाही घरी यायचे होते. असे ते म्हणाले होते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस काल घरी आले. पण त्यांनी काल ​​कोणतेही संकेत दिले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ताई गेली 20 वर्षे काम करत होत्या. पक्षात त्यांनी विविध पदे भूषवली.

पक्षाने दिलेल्या आदेशानुसारच पुढे जाण्याचे त्यांचे धोरण होते. आमचे एकच धोरण आहे. पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. ताईंनी त्यांच्या आजारपणात जे काम केले त्यावर मात्र आज अन्याय झाला ही खंत त्यांनी व्यक्त केली. असे म्हणत शैलेश टिळक यांच्या डोळ्यातून अश्रू आले.

पुणे जिल्ह्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर हेमंत रासने हे कसबापेठमधून पक्षाचे उमेदवार असतील.

शनिवारी भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या दोन्ही जागांवर भाजप दिवंगत आमदारांच्या कुटुंबीयांना तिकीट देणार असल्याचे समजले होते, मात्र कसबापेठमधून पक्षाने येथून आमदार राहिलेल्या मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्याऐवजी रासने यांना संधी दिली आहे. .

पुणे महापालिकेत भाजपचे नगरसेवक राहिलेले रासने पुणे महापालिकेत दोन वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी महिला या बचत गट  चालवतात. जगताप यांच्या निवडणूक प्रचारातही त्या सक्रिय होत्या.

लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनाही या जागेवरून उमेदवारी करायची होती. त्यांनी उमेदवारी अर्जही घेतला होता मात्र आता अश्विनी यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या
शरद पवारांमुळेच मुख्यमंत्रीपद हातातून गेले; अजित पवार स्पष्टच बोलले, थेट काकांची चूकच दाखवली
गौतम अदानींना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, थेट शेअर मार्केटमधूनच झाली हकालपट्टी
‘माझा भाऊ मुख्यमंत्री आहे, एका झटक्यात तुमची वर्दी उतरवेल..’; पोलिस स्टेशनमध्ये दारू पिऊन राडा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now