Share

सारा तेंडूलकर की सारा अली खान? शुभमनच्या अफेअरचे रहस्य उलगडलं, थेट दोघांचा फोटो आला समोर

sara shubman gill

भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिल हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध टी- २० सामन्यात शतक झळकावल्यापासून शुभमन गिल भारताच्या क्रिकेट चाहत्यांचा फेव्हरेट बनला आहे. गिल क्रिकेटसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

शुभमन गिलचे सारा अली खानसोबत अफेअर असल्याची चर्चा आहे. आधी त्याला सारा तेंडूलकरसोबतही स्पॉट करण्यात आले आहे. पण आता तो सारा अली खानसोबत दिसला आहे. त्यांचा  विमानतळावरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एका यूजरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सारा आणि शुभमन गिल एकत्र बसलेले दिसत आहेत. हा फोटो विमानतळाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. फोटोमध्ये सारा आणि शुभमन एकत्र बसलेले दिसत आहेत. दोघेही एकमेकांशी बोलत आहे. सारा अली खान आणि शुभमनच्या या फोटोमुळे त्यांच्या अफेअरची बातमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सारा आणि शुभमनचा हा व्हायरल झालेला फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. साराचा हा क्रिकेटरसोबतचा फोटो ताजा आहे की जुना, त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण सारा आणि शुभमन यांच्यात काहीतरी सुरू आहे हे निश्चित, अशी चर्चा आहे.

याआधीही त्यांचे अनेकदा फोटो व्हायरल झाले आहेत. लोकांनी सारा आणि शुभमनला गुपचूप भेटताना पाहिले आहे. अफेअरबाबत साराने आतापर्यंत काहीही भाष्य केलेले नाही. सारा आणि शुभमनच्या डेटिंगची बातमी पहिल्यांदा समोर आली तेव्हा दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसले होते.

sara shubman gill

दोघांचा एकत्र फोटो तुफान व्हायरल झाला. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या. साराच्या आधी शुभमनचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्याशी जोडले गेले होते. तर साराचे पूर्वीचे नाते कार्तिक आर्यनसोबत होते. पण सारा आणि शुभमन गिलच्या नात्याबाबत अजूनही पुर्णपणे खुलासा झालेला नाही.

सलामीवीर शुभमन गिल सध्या क्रिकेटमध्ये जबरदस्त फलंदाजी करत आहे. एकदिवसीय फॉर्मेटनंतर आता त्याने टी २० मध्येही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. गिलने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबाद टी-२० मध्ये शानदार शतक झळकावले. त्याने ६३ चेंडूत १२६ धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडला टी-२० मालिकेत २-१ ने पराभूत केले.

महत्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेवरचा दावा टाळायला हवा होता, लायकी नसल्याने..”, बच्चू कडू स्पष्टच बोलले
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम वनिता खरातच्या लग्नाचा उडाला बार; लग्नाचे फोटो तुफान व्हायरल
फडणवीसांना दणका! नागपुरात मविआचा दणदणीत विजय, भाजपचा बालेकिल्ल्यातच सुपडा साफ

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now