फडणवीसांना दणका! नागपुरात मविआचा दणदणीत विजय, भाजपचा बालेकिल्ल्यातच सुपडा साफ

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासून आघाडीवर असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले विजयी झाले आहेत. या विजयासह महाविकास आघाडीने भाजपला आणखी एक धक्का दिला आहे.

नागपुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव केला. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सुधाकर आडबोले यांच्या विजयानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. ‘भाजपच्या पालक संघटनेच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर आडबोले विजयी झाले. असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.

आधी महाविकास आघाडीने एकजूट दाखवत पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव केला. त्यानंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा पदरी पराभव आला. भाजपला ही जागा वाचवता आली नाही. हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याचा परिणाम भविष्यात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.

जेव्हा आपण टिम म्हणून काम करतो तेव्हा त्याचे फळ मिळते, हे जिल्हा परिषद निवडणूक, जिल्हा परिषद पोटनिवडणूक, नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांचा विजय आणि आता नागपूर शिक्षक मतदारसंघातील सुधाकर आडबोले यांचा विजय यातून दिसून येते.

हा महाविकास आघाडीचा विजय आहे. ही एकता कायम राहील. 2024 हे आमच्या विरोधकांना आणखी एक मोठे धक्के बसणार आहे. कोण हरेल सांगता येत नाही. मात्र आमचा विजय निश्चित असल्याचे माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी सांगितले.

आजच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे बबनराव तायवाडे म्हणाले, महाविकास आघाडीत आम्ही सर्वजण एकत्र राहिलो. आम्ही आधीच काँग्रेसचे आहोत. आम्ही सर्वच्या सर्व 34 युनियन एकत्र केल्या. त्यांचे एकमत तयार केले. सुधाकर आडबोले यांना उमेदवारी दिली.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि प्रदेशाध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे बाजू मांडली. आम्ही त्यांचेच असल्याचे त्यांना सांगितले. शिक्षक मतदारसंघ हा राजकीय नसून संघटनात्मक मतदारसंघ असल्याचे आम्ही काँग्रेस नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले. आमदार सुनील केदार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार अभिजीत वंजारी यांनी आभार मानले.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले यांना हिल्या फेरीत एकूण १४०६९ मते मिळाली. भाजपचे नागो गाणार यांना ६३६६ मते मिळाली असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर राजेंद्र झाडे यांना २७४२ मते मिळाली.

नागपुरात सुधाकर आडबोले, नागो गाणार, राजेंद्र झाडे यांच्यात लढत झाली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले विजयी झाले आहेत.