रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत हे कोल्हापूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. कौतूक हे तुमच्यासाठी आहे की पदासाठी हे ओळखायला पाहिजे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
मी मंत्री झालो, त्यावेळी घरासमोर लोकांच्या दोन किलोमीटर गाडीच्या रांगा होत्या. मंत्री झालो की, पीए वाढवले, अधिकारी आले, लोकं कौतूक करु लागली. लोकं म्हणायची भाऊ तुमच्यासारखा मंत्री नाही. पण कौतूक माणसाला फसवत असतं, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
तसेच भरलेल्या कणसातील दाणं संपल्यावर पाखरं उडून जातात तशी पाखरं उडून गेली. आता मी एकटाच राहिलो. एक पण कौतूक करणारा राहिला नाही. त्यामुळे कौतूक तुमच्यासाठी आहे की पदासाठी हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे, अशी व्यथा सदाभाऊ खोत यांनी मांडली आहे.
बातमी कधीही येऊ, आज वाईट आली तर उद्या चांगली येते. पण आपली बातमी आलीच नाही. कारण बातमी आली तरच कळेल की हा गडी जिवंत आहे. माणूस चर्चेतून संपला की त्याचं मूल्य संपतं. त्यामुळे माणूस हा नेहमी चर्चेत असला पाहिजे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
मला अनेकजण विचारतात तुम्ही राजू शेट्टींवर का बोलतात? पण मी म्हणतो राजू शेट्टींवर बोललो नाही, तर चर्चाच होत नाही. मी बोललो तर राजू शेट्टीही बोलतात. त्यामुळे पुढील दोन दिवस आम्ही दोघे पण चर्चेत राहतो, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
तसेच जेव्हा मंत्री होतो तेव्हा किती चौकशी समित्या नेमल्या मलाच माहिती नाही. मी मंत्री असताना अधिवेशन काळात पहाटे चार वाजेपर्यंत. करायचो. पण नंतर तो बंद केला. मधल्या वाटेने पळून जाता येत पण एकनाथ शिंदें यांच्यासारखं मला जमत नाही, असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
“काही जण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसे सर देखील मला पायदळी तुडवतात”
‘मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत, मी त्यांच्या जागी असतो तर…’; प्रकाश आंबेडकरांचं हैराण करणारं वक्तव्य
उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार? प्रसिद्ध उद्योगपतीच्या माध्यमातून दोघांमध्ये चर्चेला सुरवात? वाचा आतली बातमी






