India vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या मुंबईत तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक होताच टीम इंडियाच्या एका खेळाडूला मोठा धक्का बसू शकतो.
कर्णधार हार्दिक पंड्या या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करू शकतो. वास्तविक, नुकत्याच झालेल्या आकड्यांवर नजर टाकली तर तुम्हीही हार्दीकशी सहमत व्हाल. कारण आता या खेळाडूमध्ये अशी क्षमता दिसून येत नाही की तो कठीण परिस्थितीत टीम इंडियासाठी सामना जिंकू शकेल.
श्रीलंकेला टी-20 फॉरमॅटमध्ये धोकादायक टीम मानली जाते. आशिया चषक 2022 मध्ये, श्रीलंकेच्या संघाने सुपर 4 फेरीत बलाढ्य टीम इंडियाला कसे पराभूत केले आणि स्पर्धेतून बाहेर फेकले याचा ट्रेलर देखील संपूर्ण जगाने पाहिला आहे. टिम इंडीयाला तिथे दारूण पराभव स्विकारावा लागला होता.
नवा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्या नेतृत्वाखाली हरण्याचा धोका अजिबात घेणार नाही. अशा परिस्थितीत तो या खेळाडूला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवेल. हार्दिक पांड्या या खेळाडूला श्रीलंकेविरुद्धच्या संपूर्ण T20 मालिकेत बेंचवर बसवून ठेवू शकतो.
टीम इंडियाचा लेग-स्पिनर युजवेंद्र चहल सध्या खराब फॉर्ममधून जात आहे आणि कर्णधार हार्दिक पंड्या या खेळाडूला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. गेल्या 10 T20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये लेगस्पिनर युझवेंद्र चहलला केवळ 10 विकेट घेता आल्या आहेत. यापैकी चार टी-20 सामन्यांमध्ये युझवेंद्र चहलला एकही विकेट घेता आली नाही.
टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात लेगस्पिनर युझवेंद्र चहलला संधी देण्याची चूक करू इच्छित नाही, कारण युझवेंद्र चहल त्याच्या फ्लॉप कामगिरीमुळे टीम इंडियाच्या पराभवाचा सर्वात मोठा खलनायक ठरू शकतो. अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पंड्या त्याच्यापेक्षाही घातक फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या जागी लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेलला संधी देईल. तसेच टिम इंडीयाचा दिग्गज फलंदाज ऋतुराज गायकवाडलाही संघाबाहेर बसावे लागेल. कारण इशान किशन आणि शुभमन गिल सलामीला येऊ शकतात.
अक्षर पटेल आपल्या घातक फिरकी गोलंदाजीने श्रीलंकेविरुद्ध कहर करू शकतो. याशिवाय ऑफ-स्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये मदत करेल. धोकादायक ऑफस्पिनर असण्यासोबतच वॉशिंग्टन सुंदर हा एक स्फोटक फलंदाज देखील आहे आणि त्याने यापूर्वी टीम इंडियासाठी अनेक स्फोटक खेळी खेळल्या आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन अशी असेल!
शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि हर्षल पटेल.
भारत विरुद्ध श्रीलंका मालिका सामने:
भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिका
पहिला T20 सामना, 3 जानेवारी, संध्याकाळी 7.00 वाजता, मुंबई
दुसरा T20 सामना, 5 जानेवारी, संध्याकाळी 7.00 वाजता, पुणे
T20I मालिकेसाठी दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत.
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरित अस्लंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंदरा, महिष टेकन, महिष दूतान, राजदुस, शनिका राजपाक्षे, अशेन बंडारा, दिनुका राजपक्षे. वेल्लालेज, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.