1880 च्या काळातील ‘हे’ कोडे माहितीय का? लाखात एक बुद्धिमान व्यक्तीच ते सोडवू शकतो

सोशल मीडिया हे मनोरंजनाचे एक मोठे साधन आहे. यावर बऱ्याचदा अनेक खेळ देखील उपलब्ध असतात. विशेष म्हणजे लोक आवडीने ते खेळ खेळतात. बऱ्याच लोकांना फावल्या वेळात सोशल मीडियावर असणारे गेम्स खेळायला आवडतात. हे गेम्स (Games)  फोटो व व्हिडिओ च्या स्वरूपात असतात.
सोशल मीडियावरचे हे खेळ बुद्धिमान व आकलन क्षमतेचा कस लावणारे असतात. यामध्ये विविध गोष्टींचे मूल्यमापन केले जाते. यामुळे लोकांच्या मेंदूला चालना मिळते. अनेकदा व्हिडिओ व फोटोच्या स्वरूपात असणारे हे गेम्स सोशल मीडियावर एकमेकांना शेअर केले जातात. दरम्यान असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा फोटो म्हणजे एक चित्र असून यामध्ये ऑप्टिकल भ्रमाचा (ऑप्टिकल इल्युजन) संदर्भ आहे. हे चित्र क्षणात आकार बदलणारे असून ते लोकांचे मन वळवते व त्यांना भुरळ पाडते. या ऑप्टिकल इल्युजन स्पॉटमध्ये एका कुत्र्याचे स्केच दाखवले गेले आहे, ज्यामध्ये माणसाचा चेहरा लपविला गेलाय.
आता या चित्रात माणसाचा चेहरा ओळखणे हा या ऑप्टिकल भ्रमाचा सर्वात कठीण भाग आहे . या चित्राच्या खेळाने कित्येक लोकांचे मेंदू बधिर झाले आहेत. कारण ऑप्टिकल भ्रमामुळे कोणालाही फक्त 15 सेकंदात प्राण्यांच्या केसांमध्ये लपलेला माणसाचा चेहरा सापडत नाही.
गंमत म्हणजे सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या या चित्रासोबत असा दावा करण्यात आला आहे की, कुत्र्याच्या चित्रात लपलेल्या व्यक्तीचा चेहरा अवघ्या 15 सेकंदात ओळखू शकणारा माणूस खूप बुद्धिमान असणार आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु, 1880 मध्ये खास मुलांसाठी हे कोडे बनवण्यात आले होते.
या काळापासून हे अतिशय अवघड कोड्यांपैकी एक कोडे म्हणून ओळखले जाते. खरंतर, कठीण कोडी सोडवण्यासाठी मेंदूचा जास्त व्यायाम केल्यास तुम्ही जास्त हुशार होता. असे संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. यामुळे सोशल मीडियावर असणारी अशी कोडी सोडवणे व खेळ खेळणे फायदेशीर ठरते.
महत्वाच्या बातम्या
अनंत अंबानींच्या एंगेजमेंटमध्ये १० मिनीट नाचायला मिकासिंगने घेतले ‘इतके’ कोटी; आकडा ऐकून थक्क व्हाल
“असं करताना तुम्हाला थोडीतरी लाज वाटली पाहिजे”; या कारणामुळे पत्रकारांवर खूपच भडकली रोहितची पत्नी
पत्नीला ट्रॅक्टरखाली चिरडले अन् रचला अपघाताचा बनाव; ‘या’ कारणामुळे सत्य आले समोर
लग्नानंतर पत्नीच्या वागण्यावरून आला संशय; पतीने गुपचूप सुरू केले काॅल रेकाॅर्डींग अन् फुटले बिंग