jalgaon : जळगावकरांचा नाद करायचा नाय! गोमुत्र पिऊन केले नववर्षाचे दणदणीत अन् खणखणीत स्वागत

jalgaonkar drink gaumutra  | शनिवारी नुकतंच २०२२ वर्षे संपलं आहे. नवीन वर्षाची सुरुवात म्हणून अनेकांनी पार्टीचा बेत आखला होता. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांनी वेगवेगळे प्लॅन आखले होते. काही देवदर्शनाला गेले तर काही लोकांनी विविध ठिकाणी जाऊन पार्ट्या केल्या.

अशात जळगावातून एक भलताच प्रकार समोर आला आहे. जळगावामध्ये थर्टी फर्स्टला गोमूत्र प्राशन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांनी या गोमूत्र प्राशन करुन नवंवर्षाचं स्वागत केलं आहे. रतनलाल बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये हे आयोजन करण्यात आलं होतं.

३१ डिसेंबर म्हटलं की अनेकजण मटण आणि दारुची पार्टी करतात. पण असं न करता अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत त्यांनी केले आहे. अनुसंधान केंद्रतील गोभक्त दरवर्षी गोमूत्र पिऊन अनोख्या पद्धतीने नववर्षाचं स्वागत करताना दिसतात.

दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात गोभक्तांनी गौमूत्र प्राशन पार्टीचं आयोजन केलं होतं.गोमूत्र पिल्याने आरोग्य निरोगी राहते. आयुष्य वाढते, अशी गोभक्तांची श्रद्धा आहे. तसेच गोमूत्र पिल्यानंतर दारु पिण्याची इच्छा होत नाही, असेही काही लोकांचे म्हणणे आहे.

तसेच जे लोक गोमूत्र पितात, ते दारु मटणापासून दुर राहतात. त्यामुळे या पार्टीचे आयोजन केले होते. अनेकांनी यावेळी गोमूत्र पिऊन आपल्या नव्यावर्षाला सुरुवात केली आहे. गोमूत्र पिल्याने कोणत्याही प्रकारची नशा होत नाही, त्यामुळेही काही ते प्राशन करताना दिसून आले.

थर्टी फर्स्टला अनेकांनी दारु आणि मटणाचे प्लॅन आखले होते. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वायाही जातात. तसेच दारुचा शरीरावरही चुकीचा परिणाम होतो. त्यामुळे रतनलाल बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये गोमूत्र प्राशनचे आयोजन करण्यात आले होते.