ajit pawar talking about chhatrapati sambhaji maharaj | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. याचा शेवटचा दिवसही आज झाला असून यादिवशीही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये आरोपप्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले.
हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे. तर त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. तुम्ही बाहेर जे केलं ते विसरुन जा, मुख्यमंंत्र्यांचं भाषण पुर्णपणे राजकीय होतं, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील अधिवेशनात एखादा दुसरा चिमटा सोडला तर कधीही कोणत्याही राजकीय नेत्याने राजकीय भाषण केलं नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं भाषण हे पुर्णपणे राजकीय होतं, असे म्हणत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
तुम्ही सहा महिन्यांपूर्वी काय केलं त्यातून तुम्ही बाहेर या. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी ही संस्कृती पाळली आहे. पण मुख्यमंत्री शिंदे अजूनही तिथेच आहे. त्यांनी तिथून बाहेर पडलं पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
महापुरुषांचा अवमान झाला. त्याच्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही शब्द काढला नाही. तसेच आपण स्वराज्य रक्षक संभाजी असा छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करतो. पण काही लोक जाणीवपूर्वक त्यांना धर्मवीर म्हणत आहे. संभाजीराजेंनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
महापुरुषांचा अवमान होणार नाही यासाठी मंत्र्यांची हकालपट्टी करा. राज्यपाल हटवा या मुद्यांवर न बोलता त्यांनी दुसरे विषय काढून या प्रश्नांना बगल दिली. एकनाथ शिंदे शिवसेना फोडून बाहेर आले, पण ते त्याच्याबाहेर आलेच नाही. जो व्यक्ती सभागृहातच नाही त्याच्याबद्दल शिंदे बोलताय, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
एका आमदारावर २० लाख रुपये खर्च येतो. ज्याला आवश्यकता आहे त्याला सुरक्षा दिली पाहिजे. जे त्यांच्या बाजूने आहे त्यांना सुरक्षा दिली आणि विरोधातील आमदारांची सुरक्षा काढली. फडणवीस यांच्यावर कारवाईची तयारी होती. असे मुख्यमंत्री म्हणाले पण मला तसं दिसलं नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
तसेच अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये घेतल्याचे आरोप झाले. उद्या यांच्यावर कोणी २०० कोटींचे आरोप केले तर हे जेलमध्ये जातील का? एखाद्या व्यक्तीचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
pune : कोयते नाचवत पुण्यात टोळक्याचा धुमाकूळ; पोलिसांने असे तुडवले की सगळी मस्तीच जिरवली;पहा VIDEO..
ऋषभ पंतच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
अपघातानंतर तडफडणाऱ्या पंतला मदत करण्याऐवजी स्थानिक लोकांनी केलं ‘हे’ लज्जास्पद कृत्य






