jitendra awhad : ‘१ जानेवारीला भीमा कोरेगावला आलात तर तुमचा खिमा होईल’; जितेंद्र आव्हाडांचा ‘या’ लोकांना थेट इशारा

jitendra awhad angry on angry sena  | भीमा कोरेगाव येथे दरवर्षी १ जानेवारीला शौर्यदिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कार्यक्रमही होतात. पण या कार्यक्रमाला आता करनीसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

करनीसेनेने कार्यक्रमाला विरोध केल्यानंतर अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना करनीसेनेला इशारा दिला आहे.

करनीसेना जर एक तारखेला भीमा कोरेगावला आली तर त्यांचा खिमा होईल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी याविषयावर भाष्य केलं आहे.

ज्यांना भीमा कोरेगावचा इतिहास माहिती नाही. त्यांनी याबाबत वक्तव्ये करु नये. अशाप्रकारची वक्तव्य करुन समाजातील कायदा व सुव्यवस्था बिघडवू नका. बाहेर राज्यात बसलेल्यांनी महाराष्ट्रातल्या विषयांवर चर्चा करु नये, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जे पेशवे करु शकले नाही ते हे काय करणार. १ जानेवारी हा आमच्या हक्काचा आणि शौर्याचा दिवस आहे. करनीसेना आणि फर्सीसेना यांनी तिथे येऊन दाखवावं. करनीसेना ही पळकुटी सेना आहे. जर ते १ तारखेला भीमा कोरेगावला आले तर त्यांचा खिमा होईल,असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, इंग्रजांकडून लढलेल्यांचा उदोउदो होता कामा नये. भीमा कोरेगावची लढाई ही जातीय नव्हती. पुण्यावर इंग्रजांना कब्जा मिळवायचा होता.त्यामुळे हे सर्व होतं. पण प्रकाश आंबेडकर आपल्या फायद्यासाठी या चकमकीला जातीय स्वरुप देत आहे, असे करनीसेनेचे सेंगर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राज्यात वाद निर्माण होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-
माझ्या मृत्यूस ‘ते’ चौघे जण जबाबदार, मृतदेहाच्या अंतर्वस्त्रात चिठ्ठी आढळल्याने हिंगोली हादरलं
डुलकी लागली अन् दुभाजकाला धडकली कार; गंभीर जखमी पंतने स्वत: सांगीतले कसा झाला अपघात, म्हणाला…
रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; गंभीर जखमी अवस्थेत तातडीने दिल्लीला हलवले, कार जळून खाक