gautami patil event cancel | प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे. गौतमी लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करते, असे म्हणत तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते. तिच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या जोरादर टीका झाली होती.
अशात काही संघटनांनी गौतमी पाटीलच्या लावणीवर बंदी घाला, अशी मागणी केली होती. पण मी लावणी बंद करणार नाही, असे गौतमी पाटीलने म्हटले होते. असे असले तरी पहिल्यांदाच गौतमी पाटीलचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
पुढील दोन महिन्यांच्या कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेतल्या असताना यातील पहिला कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गौतमी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे गणेश जयंतीनिमित्त लावणी सादर करणार होती. तो कार्यक्रम आता रद्द झाला आहे.
गौतमीच्या सांगलीतील एका कार्यक्रमात तुफान राडा झाला होता. त्या कार्यक्रमात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झाला होता. तर अनेक लोक हे जखमी झाले होते. त्यामुळे गौतमीच्या आधीच्या कार्यक्रमांमध्ये घडलेल्या घटनांना लक्षात घेऊन निमगाव केतकीच्या गावकऱ्यांनी गौतमीच्या कार्यक्रमाला जागा देण्यास नकार दिला आहे.
गौतमी तिच्या लावणीमुळे खुप चर्चेत आहे. पण ती लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करते अशी टीका तिच्यावर वारंवार होताना दिसते. तिचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यामुळे ती राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर सांगलीतील कार्यक्रमात जे घडले त्यामुळे तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली.
यासर्व गोष्टींवर गौतमीनेही प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली होती की, मी बघतेय की काही लोक माझ्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी करत आहे. पण मी लावणी बंद होऊ देणार नाही. माझे कार्यक्रम लोकांना खुप आवडतात. त्यांचे माझ्यावर खुप प्रेम आहे. मध्यंतरी माझ्याकडून चुका झाल्या असतील. पण मी त्याची माफी मागितली आहे. पण मी कार्यक्रम बंद करणार नाही. लोकांनी माझाही विचार करावा. माझी काळजी कोणी करणार आहे की नाही?
महत्वाच्या बातम्या-
rupali chakankar : रुपाली चाकणकर करणार रूपाली ठोंबरेंवर कठोर कारवाई; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण
ajit pawar : अजित पवारांनी काढली उद्धव ठाकरेंच्या मागणीतील हवा, राऊतांनाही सुनावले खडे बोल; म्हणाले…
8वी पास अभिजित सराग कसा झाला कालीचरण महाराज? वाचा कहाणी.. ‘या’ महाराजांशी होते खास नाते