ritesh deshmukh : ‘मी तुमची हात जोडून माफी मागतो पण कृपया…’; रितेश देशमुखवर का आली ही वेळ? जाणून घ्या…

ritesh deshmukh apologize to media  | प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. वेड या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रितेश देशमुख व्यस्त आहे. अशात कोल्हापूरात रितेश देशमुखच्या मीडिया ऑर्गनायझरकडून पत्रकारांचा अपमान करण्यात आला होता.

आता त्याप्रकरणी रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने अवमान झालेल्या सर्व पत्रकारांची माफी मागितली आहे. तुमचा अवमान झाला. मला माफ करा असे रितेश देशमुखने म्हटले आहे. कोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनानंतर रितेश देशमुख बोलत असतानाही काही पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्याने माफी मागितली आहे.

रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशात तो कोल्हापूरातही त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. तसेच त्याने महालक्ष्मीचेही दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी त्याने संवाद साधला. यावेळी रितेशच्या मीडिया ऑर्गनायझरने पत्रकारांचा अवमान केल्याचे एका पत्रकाराने सांगितले. त्यानंतर रितेशने यावर माफी मागितली आहे.

तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून अवमान झाला असेल तर मी तुमची माफी मागतो. आम्ही कोणाशी भेटणार आहोत हे आम्ही ऑर्गनाईज केलेलं नव्हतं. त्यामुळे कदाचित हा सर्वप्रकार घडला असेल, असे म्हणत रितेश देशमुखने पत्रकारांची माफी मागितली आहे.

तुमच्यासोबत नक्की काय घडलं हे मला माहिती नाही. मी इथे आलो पण मला कोणाशी भेटायचं आहे हेही मला माहिती नव्हतं. ते माझ्या हातातही नाही. तुमचा माझ्याकडून अवमान झाला असेल तर मी माफी मागतो. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहचल्या आहे, असे रितेश देशमुखने म्हटले आहे.

माझ्या लग्नाला ११ वर्षे झाली आहे. पण कोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनाला आम्हाला कधीच एकत्र येता आले नाही. काही लोकांची समोरासमोर भेट झाली नाही, त्यांची मी माफी मागतो. तुम्हा सर्वांवर महालक्ष्मीचा आशीर्वाद असावा हीच इच्छा, असेही रितेशने म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या-
subramanyam swami : मोदी हिंदुत्ववादी नाही, ज्यांना वाटतं ते चांगले काम करताय ते मोदीचे चमचे; भाजप नेत्याचा घरचा आहेर
जुळ्या नातवांचे मुकेश अंबानींकडून जोरदार स्वागत; १ हजार पुजाऱ्यांवर उधळले ३०० किलो सोने
महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्याचा नाद खुळा! दूध विकण्यासाठी खरेदी केले चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर, शेतात उभारले हेलिपॅड