मुंबई | हौसेला मोल नसतं हेचं खरं.. कोणाला महागड्या गाड्यांचं वेड असत तर काहींना सोने-चांदीच असतं. भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
देशात अनेक श्रीमंतांकडे हेलिकॉप्टर आहेत, आपण ते बघत असतो, मात्र कधी दुधाची विक्री करणाऱ्या व्यक्तीकडे हेलिकॅप्टर आहे, असे आपण आतापर्यंत ऐकले नाही. मात्र ते खरे आहे, कोणत्या दुधवाल्याने तर खरेदी केलंय आपण जाणून घेऊयात. या दूध विक्रेत्याचे नाव जनार्दन भोईर असून हे महाराष्ट्रातील भिंवडी येथे राहतात.
ते दुधाचे व्यापारी आणि शेतकरी देखील आहेत, त्यांच्याकडे रियल इस्टेटचा व्यवसाय देखील आहे. दुधाचे व्यापारी असलेल्या जनार्दन भोईर यांना आपल्या व्यवसायासाठी अनेक राज्यात व परदेशात जावे लागते. यामुळे त्यांनी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
वेळ वाचवण्यासाठी त्यांनी ३० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. जनार्दन यांनी आपल्या अडीच एकर जागेवर हेलिपॅड करून घेतले आहे. त्यांच्याकडे पायलट रूम आणि टेक्निशियन रूम देखील आहे. यामुळे सर्व सोयी त्यांनी उपलब्ध करून घेतल्या आहेत.
हेलिकॉप्टरसाठी राऊंड बेल्ट्स आणि इतर वस्तूदेखील बनविल्या आहेत. जनार्दन यांनी जेव्हा हेलिकॉप्टर आणला तेव्हा तेथील आजूबाजूची माणसे भारावून गेली होती. प्रत्येकजण हेलिकॉप्टरमध्ये बसण्यास उत्सुक झाला होता. अनेकजण ते बघण्यासाठी येत असत. यामुळे ते चर्चेत आले आहेत.
जनार्दन यांनी सगळ्यांना बसवून चक्कर देखील मारली. डेअरी व्यवसायामुळे जनार्दन महिन्यातील १५ दिवस हरियाणा, राजस्थान आणि गुजरातला जात असतात. त्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. आता त्यांच्याकडे हेलिकॉप्टर असल्याने त्यांचा वेळ वाया जात नाही.
कोणतेही काम हे छोटे किंवा मोठे नसून, जर काम मनाने केले तर कोणतेही काम करून पैसे मिळू शकतात. दूध व्यवसाय करुन देखील आपण मोठे होऊ शकतो. आपल्याला नफा देखील होऊ शकतो, जनार्दन भोईर यांनी हे दाखवून दिले आहे. त्यांनी या व्यवसायात मोठी प्रगती केली आहे.
भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क ३० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वाना अचंबित केले आहे.
भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीत गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. यातून आर्थिक सुबत्ता आलेल्या जनार्दन भोईर यांचे व्यवसाया निमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तिंशी संपर्क आल्याने त्यांनी नव्या व्यवसायाचे धाडस केले.
त्यानंतर भोईर यांना स्वतःच्या दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या भागात नेहमी जावे लागते. तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी घरी सर्व सुखसुविधा असल्याने हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
jaykumar gore : भाजप आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात; कार थेट ३० फुट खोली दरीत कोसळली, आमदारांसह ४ जण…
aditya thackeray : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर अखेर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले, त्यादिवशी मी…
kolhapur : वाढदिवसाची तयारी करत असतानाच तरुणाला आला हार्टॲटॅक; शुभेच्छांचे स्टेटस बदलले श्रद्धांजलीत