Share

aditya thackeray : दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? अखेर आदित्य ठाकरेंनी केला खुलासा, म्हणाले…

aditya thackeray disha salian

aditya thackeray on disha saliyan  | अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाला जवळपास अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अशात पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे यांनी आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्यावेळी रिया चक्रवर्तीचे आदित्य ठाकरे यांना ४४ फोन आले होते, असा दावा राहूल शेवाळे यांनी केला. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाशीही आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

आता आदित्य ठाकरे पहिल्यांदाच याप्रकरणावर बोलले आहे. दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा ते कुठे होते? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्याचे उत्तर आदित्य ठाकरेंनी दिले आहे. यावेळी त्यांनी गंभीर आरोप करणाऱ्यांवर टीकाही केली आहे.

त्यादिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं. त्यामुळे मी त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये होतो. लोकांना जे काढायचं ते काढू द्या. पण हे खरं आहे की ३२ वर्षाच्या तरुणाला हे सरकार घाबरलं आहे. त्यांचा घोटाळा बाहेर काढून महाविकास आघाडीने हे सरकार हादरून ठेवलं आहे. म्हणूनच ते घाबरलेले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच पोलिस ठाण्यात चौकशीला बोलवलं तर जाणार का? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले की, जो कोणी सत्य बोलण्याची ताकद ठेवतो त्यांना सतावलं जातं. मग ते जितेंद्र आव्हाड असतील किंवा भास्कर जाधव. आज राजकारण्यांना सतावलं जातंय, उद्या पत्रकारांनाही सतावलं जाईल. आमची लढाई जनतेसाठी आहे. आम्ही ती लढत राहू, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

ते शाईला घाबरतात आम्ही घाबरत नाही. आम्ही पट्टेरीच वाघ आहोत. त्यांचे पट्टे गेलेले आहेत. ते आता मांजर झालेले आहे. मुख्यमंत्र्यांचा भुखंड घोटाला लपवण्यामागे ते डाव रचत आहे. पण राज्यपालांनी शिवरायांचा केलेला अपमान आणि मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्यावर आम्ही सतत बोलत राहू असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

तसेच एका बाजूला ५ प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी गुजरातला नेले आहे. दुसरीकडे कर्नाटक महाराष्ट्रातील गाव तोडण्याचा प्रयत्न करत आहे. नागपूरमध्ये एनआयटी भूखंड काही खोक्यांसाठी विकले जातात. पण आम्ही याच्यावर बोलू नये अशी त्यांची इच्छा आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
jaykumar gore : स्वत: गंभीर जखमी होऊनही आधी चालकाला अन् सचिवाला रुग्णालयात पाठवलं; आमदार गोरेंचा दिलदारपणा
मुलांना चॉकलेट वाटणाऱ्या सांताक्लॉजला लोकांची बेदम मारहाण; म्हणाले, हिंदू वस्तीत हे चालणार नाही
aditya thackeray : दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर अखेर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले, त्यादिवशी मी…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now