shivsena leader sushma andhare apologize | शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे त्या वादातही अडकतात. असेच काहीसे वक्तव्य त्यांनी वारकरी संप्रादायाबद्दल केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा असे म्हटले जात होते. पण आता सुषमा अंधारे यांनी माफी मागितली आहे.
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीरपणे माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता हा वाद मिटण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्या संदर्भात काही वक्तव्ये केली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर तीव्र नाराजी वक्त केली जात होती. सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागावी, असे ते म्हणत होते. आता यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या भाषणांमधून मी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात टीका करत आहे. त्यामुळे माझे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे. मी कबीरपंथी आहे. त्यामुळे कोणाच्या श्रद्धेच्या आड येत नाही. कर्मकांड न करता चैतन्य मानते. तरी देखील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
भाजपमध्ये पुरस्कृत वारकरी आघाडीचे लोक आहे. जे लोक कधीच वारीत पायी चालले नाही. त्या लोकांनी कोरोना काळात स्टंट केला. माझा निषेध करण्यासाठी वारकऱ्यांनी माझी अंतयात्रा काढली. भाजपच्या वारकऱ्यांनी माझी अंतयात्रा काढली त्याबद्दल मला आनंदच आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
मी क्षमा मागते. वारकऱ्यांची हात जोडून माफी मागताना मला काहीही गैर वाटत नाही. मी कधीही माफी मागितली नाही. मी माझ्या वक्तव्यांमुळे एकाही राजकीय पक्षाची माफी मागितली नाही. पण मी वारकरी संप्रदायाची माफी मागते कारण ती माझी माणसं आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
शाहरुखच्या सिनेमात भगव्याचा अपमान झाल्याचा आरोप; दीपिकाच्या बोल्ड ड्रेसमुळे हिंदू संघटना खवळल्या
रोहितची सुट्टी, प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा संघ? नवीन वर्षासाठी BCCI चा धक्कादायक प्लॅन आला समोर
तवांगमधील परिस्थिती गलवानसारखी नव्हती, सॅटेलाइट फोटोंमधून सत्य आले बाहेर; यावेळी भारतीय सैन्य होते सज्ज






