Share

sharad pawar : सीमाप्रश्नावर वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा शरद पवारांनी दत्ताची उपासणा करावी; महंतांचा सल्ला

sharad pawar

nashik mahant on sharad pawar statement  | महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मंगळवारी बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती.

हे प्रकरण येत्या ४८ तासात संपलं नाही, तर मला बेळगावात जावं लागेल. तेथील स्थानिकांना धीर द्यावा लागेल. वाहनांवरील हल्ले थांबले नाही, तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

आता या वक्तव्यावरुन नाशिकच्या महंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवारांना एक सल्ला दिला आहे. शरद पवारांनी दत्त उपासना करावी, ४८ तासांचा अल्टिमेटम देण्याची वादग्रस्त विधाने त्यांनी करुन नये, असे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे.

चाळीस वर्षांपासून शरद पवार यांनी वेगवेगळी मंत्रिपदं भूषावली आहे. पण आतापर्यंत शरद पवारांनी सीमावाद मिटवला नाही. त्यात ते ४८ तासांची मुदत देऊन हा वाद आणखी चिघळवत आहे. आज दत्त जयंती आहे. त्यामुळे लाखो भाविक कर्नाटकातील गणगापूरला जातात. तिथे काही दुर्घटना घडली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी शरद पवारांची असेल, असे अनिकेत शास्त्री यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, कर्नाटक सीमावाद प्रश्न चर्चा करुन सुटणार नाही. त्यामुळे शरद पवारांनी आज दत्त उपासना करावी. या भानगडीत न पडता ४८ तासांचा अल्टिमेटम देण्याची वादग्रस्त विधाने पवारांनी करु नये. महाराष्ट्र कर्नाटक आणि देशाची शांतता त्यांनी भंगवू नये, असेही अनिकेत शास्त्री यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी बेळगाव-हिरेबागवाडी येथे महाराष्ट्राची पासिंग असलेल्या ६ ट्रकांना लक्ष्य केले गेले. हे ट्रक पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली होती. इतकंच नाहीतर हे ट्रक थांबवून त्यावर दगडफेक सुद्धा केली. यावेळी कन्नड रक्षण वेदिका संघटनेत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओही समोर आला होता.

महत्वाच्या बातम्या-
india : श्वास रोखून धरायला लावणाऱ्या हायहोल्टेज सामन्यात भारताचा पराभव; जखमी रोहीत वाघासारखा लढला
अक्षरश लाज निघाली! दुबळ्या बांगलादेशनेही भारताला हरवले; ‘या’ ५ खेळाडूंमुळे झाली लाजिरवाणी हार
क्रिकेटच्या मैदानात धुमाकूळ घालायला आला सेहवागचा मुलगा, पण दिल्ली नव्हे तर ‘या’ संघात झाली निवड

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now